Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

आत्महत्याग्रस्त कुटुंबास शेक हँड तर्फे मकरसंक्रांतीचे वाण म्हणून शेळी व पिल्लाचे वाटप





परभणी ➡️ तालुक्यातील पिंपळगाव येथील आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याच्या कुटूंबियांना उदरनिर्वाहासाठी शेक हँड फाऊंडेशनने पुढाकार घेत मकरसंक्रांतीचे वाण म्हणून शेळी व पिल्लू प्रभारी शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांच्या उपस्थितीत नुकतेच देण्यात आले.

मकरसंक्रात हा सण सौभाग्यवती अतिशय उत्साहात साजरा करतात, विधवाताईंना या सणाला दुर्लक्षित केले जाते. पण मागील काही वर्षांपासून शेक हँड फाऊंडेशनमार्फत विधावताईंच्या दारी मकरसंक्रांत सण साजरा केला जात आहे. मागील वर्षी शिवाजी कॉलेज येथे विधवाताईंची मकरसंक्रांत साजरा करण्यात आली होती. याही वर्षी विधवाताईंची संक्रांत साजरा केला जाणार आहे. त्याचप्रमाणे दर वर्षी ताईंना उदरनिर्वाहाचे साधन देऊन हा सण साजरा केल्या जातो. यावर्षी वाण रुपी उदरनिर्वाहाचे साधन अलका तुकाराम रसाळ यांना ताईंना देण्यात आले. त्यांच्या पतीने दोन वर्षांपूर्वी आत्महत्या केली. 

त्यानंतर 03 मुलींचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यांना तीन मुली असून मोठी मुलगी दुसरीत असून लहाण्या दोन मुली अंगणवाडीत आहेत. परिस्थिती अत्यंत हलाखीची असून घर अत्यंत साधे पत्राचे आहे. कुटुंबाला इतर कुणाचा कसलाही आधार नसल्यामुळे त्यांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने शेक हँड मार्फत त्यांना शेळी व पिल्लाचे वाटप जिल्हा परिषदेचे प्रभारी शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांच्या हस्ते  मकरसंक्रांतीचे वाण देण्यात आले. तसेच डॉ. भागचंद मालानी यांच्याकडून साडी चोळी व मुलींना कपडे देण्यात आले. शेळी व पिल्लासाठी महा एनजीओ फेडरेशन, कल्याण आबा लोहट, नागेश गंगथडे, अ‍ॅड. सुप्रिया पाणसंबळ, शंकर बिरादार, सागर कर्णेवार, छाया गायकवाड, अर्चना भारस्वाडकर, रंजिता मस्के, महेश काळे, प्रा.अनंत जाधव, मुंजा लोलगे, अनंत कुलकर्णी, रामेश्वर जाधव, दिवाकर जोशी, शिरीष लोहट, विस्तार अधिकारी नरहरी वाघ, सुधाकर गायकवाड, गजानन सोळंके, रोहिदास कदम, शाम गाडेकर, भास्कर वाघ, मुंजाभाऊ शिळवणे, भरत भालेराव, विकास पांचाळ, धनंजय इक्कर आदींनी मदतीचा हात पुढे केला. कार्यक्रमासाठी केंद्रप्रमुख नारायण भोसले, सुनील शेळके, संदीप राऊलवार, शिवाजी गोजरटे, रघुनाथ कराळे, शेक हँडचे संतोष चव्हाण, तर गावकरी उद्धवराव ढगे, भास्करराव ढगे, स्वामी सर आदी उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments