Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

घरातुन 40 हजार रुपयांची अवैध देशी दारु जप्त





परभणी ➡️ जिंतूर तालुक्यातील सावंगी भांबळे एका घरावर छापा मारून जिंतूर पोलिसांनी कारवाई करून 16 बॉक्स देशी दारू जप्त केली. ज्याची बाजार किंमत 39,936 हजार रुपये आहे. या संदर्भात एका आरोपीच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार जिंतूर पोलिसांना सावंगी भांबळे येथे रणजित भांबळे यांचे घरी देशी दारू विकत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. याच माहितीच्या आधारे एएसपी श्रवण दत्त साहेब उप विभागीय पोलिस अधिकारी कार्यालय जिंतूर यांचे मार्गदर्शन खाली पीएसआय  पठाण , पोलीस शिपाई रोकडे , पोलीस शिपाई माधव गोरे, गजानन  क्षीरसागर व महिला पोलिस कर्मचारी गिंगिंने यांनी दिनांक 28/01/21 रोजी रात्री 11.30 वाजता आरोपी सावंगी भांबळे येथे रणजित भांबळे यांचे घरी छापा मारून 16 बॉक्स देशी दारू जप्त केली. ज्याची किंमत 39,936 रूपये आहे. या संबंधित पो.कॉ. गजानन रोकडे यांच्या फिर्यादीवरून  आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आले.




Post a Comment

0 Comments