Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

टायरफुटल्याने कार रहाटी नदीच्या पात्रात कोसळली, दोघे बालंबाल बचावले





परभणी
➡️ परभणीहून वसमतकडे भरधाव जाणार्‍या कारचे टायर फुटल्याने कार वसमत रस्त्यावरील रहाटी पुलावरून नदीत पडली. ही घटना शनिवारी (दि.30) पहाटे एक ते दीडच्या सुमारास घडली. आज शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास पाण्यात गेलेली कार (एमएच 49 बी 8846) भोई व ग्रामस्थांच्या मदतीने काढण्यात आली. या कारमधील चालकासह अन्य एक व्यक्ती सुरक्षित असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

प्राप्त माहितीनुसार परभणीहून नांदेडकडे दोघे जण एका कारने शनिवारी पहाटे एकच्या सुमारास नांदेडकडे निघाले होते. रहाटीनदीच्या पुलाजवळ भरधाव कार येत असतानाच कारचे टायर फुटले. यामुळे चालकाचा कारवरील ताबा सुटला व व ती कार पुला लगतच्या कच्या रस्त्यावरून थेट पाण्यात गेली. 

मध्यरात्रीनंतर घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील शेतातील व पुलाचे काम करणारे काही जण तातडीने मदतीसाठी धावले. कारमधील चालकासह अन्य एका व्यक्ती तातडीने बाहेर पडल्याने ते बालंबाल बचावल्याचे प्रत्यक्षदर्शींनी म्हटले. रहाटीनदीस पाणी भरपूर असल्याने ती कार पूर्णपणे पाण्यात गेली होती. शनिवारी सकाळपासून पोहणार्‍या युवकांसह भोईंची व ग्रामस्थांची मदत घेऊन नदीपात्रात गेलेली कार सकाळी 11 वाजच्या सुमारास कार बाहेर काढण्यात आले.




Post a Comment

0 Comments