Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

चोरी प्रकरणातील मुख्य आरोपी मैनुद्दीन मुल्ला यांची निर्घृण हत्या




सांगली ➡️ सांगली जिल्ह्यातील मिरजेच्या बेथेलनगर मधील 03 कोटीच्या प्रकरणातील मुख्य आरोपी मैनुद्दीन मुल्ला याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सांगलीतील गणेशनगर येथे अज्ञात आरोपींनी पाठलाग करून त्याच्यावर धारदार शास्त्राने वार केले. यामध्ये मैनुद्दीन मुल्ला याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर मिरज परिसरात मोठी खळबळ माजली आहे. या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नऊ कोटी प्रकरण नेमकं काय?

सांगली जिल्ह्यातील बेथेलनगर येथून एका झोपडीतुन 2016 साली 03 कोटी रुपये पोलिसांनी जप्त केले होते. या प्रकरणी मैनुद्दीन मुल्ला याला त्यावेळी अटक झाली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील कडोली येथील, बांधकाम व्यवसायिक झुंजार सरनोबत यांची 8 मार्च 2016 रोजी 03 कोटी 11 लाख रुपये रक्कमेची चोरी झाली होती. सांगली पोलिसांनी संशयित मैनुद्दीन मुल्ला या चोरट्यास ताब्यात घेतल्यानंतर वारणा नगर चोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.

वारणानगर येथील वारणा शिक्षण संस्थेच्या इमारतीतील कोट्यवधी रुपयांची चोरी झाली होती. या प्रकरणात वारणा शिक्षण संस्थेच्या इमारतीतील 09 कोटी रुपये परस्पर हडप केल्याप्रकरणी सांगली स्थानिक गुन्हे शाखेच्या तत्कालीन पोलीस निरीक्षकासह 08 पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.

त्यानंतर कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिक झुंजार सरनोबत यांनी चोरीच्या रकमेवर दावा करीत पोलिसात चोरीची फिर्याद दाखल केली. पोलिसांच्या तपासात मैनुद्दीन मुल्ला याच्याकडून अनेक नवे खुलासे झाले. मैनुद्दीनला जामीन मिळाला होता. वारणानगर मधील शिक्षक कॉलनीतून जप्त केलेल्या 03 कोटी अकरा लाखांपेक्षा अधिक मोठी रक्कम पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपी मैनुद्दीनशी संगनमत करून वरील रक्कम हडप केल्याचा आरोप झुंझार सरनोबत यांनी केला होता. या प्रकरणी अधिकारी आणि कर्मचारी असा सहाजणांविरोधात दुसरा गुन्हा दाखल झाला होता.






Post a Comment

0 Comments