Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

आजपासून सहा प्रभागातील पाणीपुरवठा सहा दिवस राहणार बंद





परभणी ➡️ शहरातील राजगोपालाचारी उद्यान येथील नवीन जलकुंभाचे काम पूर्ण झाले असून राहटी येथून येणा-या रायझिंग मेन लाईनला या जलकुंभाचे क्रॉस कनेक्शन देण्याचे काम परभणी शहर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने हाती घेतले आहे. त्यामुळे दि. 30 जानेवारी ते दि. 4 फेब्रुवारी 2021 दरम्यान सहा प्रभागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने राजगोपालाचारी उद्यान येथे नवीन जलकुंभ उभारण्यात आला आहे. या जलकुंभाला राहटी येथून येथील रायझिंग मेन लाईनला क्रॉस कनेक्शन द्यावयाचे आहे. हे काम महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने हाती घेतले, असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख तन्वीर मिर्झा बेग यांनी दिली. शहरातील प्रभाग क्रमांक तीन, चार, पाच, सहा, सात व प्रभाग क्रमांक 15 मध्ये सहा दिवसात पाणीपुरवठा होणार नाही. या प्रभागांना ममता कॉलनी, खंडोबा बाजार येथील मोठ्या तर राजगोपालाचारी उद्यानातील लहान जलकुंभातून पाणीपुरवठा होतो.
 



Post a Comment

0 Comments