Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

पूर्णा शहरात 06 लाख 58 हजार रुपयांचा अवैध गुटखा जप्त





 पुर्णा ➡️ पुर्णा शहरातील जुना मोंढा परिसर व साळूबाई गल्ली परिसरात आज सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास पुर्णा पोलिस प्रशासनाने केलेल्या धाडसी कारवाई करून 06 लाखाचा गुुुुटखा जप्त केली. यासंदर्भात 03 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले.

पोलिस स्थानकात कार्यरत सहाय्यक पोलिस निरिक्षक दिनेश मुळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पुर्णा शहरातील जुना मोंढा परिसर व साळूबाई गल्ली परिसरात धाडसी कारवाई करीत पांढऱ्या रंगाची बोलेरो (एएच-37-जी-2898) ताब्यात घेऊन तपासणी केली. त्या महाराष्ट्र शासनाने व अन्न व औषधी प्रशासन आयुक्त यांनी प्रतिबंधीत केलेला तसेच विक्री व बंदीचे आदेश असतांना विषारी अवैध गुटखा साठा आढळून आला. यात गुटखा पुड्यांच्या साठ्यासह गुटखा विक्रीसाठी वापरण्यात येणारे मोबाईल आदींसह एकून 06 लाख 58 हजार 620 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.


यासंदर्भात पोलिस काँ.विनोद रत्ने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विकास माधव वेडे रा.पळसी ता.वसमत जि.हिंगोली,वाजीद जूर्दा स्टोअर झेंडा चौक वसमत जि.हिंगोली व बबलू उर्फ गुरुराज या 03 आरोपींच्या विरोधात पुर्णा पोलिस स्थानकात कलम 328,188,269,271,272,273,34

भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि.दिनेश मुळे हे करीत आहेत.

 




Post a Comment

0 Comments