Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

मुलांच्या भांडणात एकाचा खून, 10 आरोपीवर गुन्हा दाखल





परभणी
➡️ शहरातील गौस कॉलनी भागात क्रिकेट खेळण्याच्या 
मुलांच्या भांडणावरुन एका 35 वर्षीय व्यक्तीचा बेदम मारहाण करुन खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही घटना 30 जानेवारी रोजी रात्री 8.30 च्या सुमारास घडली असून याप्रकरणी कोतवाली पोलिसात 10 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार दि. 30 जानेवारी रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास फिर्याद अहमद खान यांच्या राहत्या घरी गौस कॉलनी दर्गा रोड परभणी येेथे ही घटना घडली. यात आरोपीनी गैर कायद्याची मंडळी जमवून दुपारी झालेल्या लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून अहमद खान यांच्यात पत्नी, आई व बहीण यांना शिवीगाळ करून मारहाण केली. जीवे मारण्याच्या उद्देशाने आरोपींनी लाकडी काठ्या दगड व लोखंडी रॉड ने अहमद खान व त्यांचे नातेवाईक यांना मारहाण केली. त्यात अहमद खान यांचे भाऊ माजित खान ( 35) यांना डोक्यावर जबर मारहाण झाल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना सरकारी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत्यू झाला आहे असे घोषित केले.

याबाबत मृतकांचे भाऊ अहमद खान सलीम खान (रा. गौस कॉलनी दर्गा रोड परभणी) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपी सय्यद नकिद, सय्यद मोईन, सय्यद मोईन, हाश्मी, सय्यद अब्दुल रहमान, सय्यद जिलानी, सय्यद अब्दुल इब्राहीम व इतर दोन ते तीन अनोळखी इसम (रा. परभणी) यांच्याविरुद्ध कलम- 302 ,307, 323, 324, 294, 143, 147,148,149,506 भादंविनुसार दि.31 जानेवारी रोजी सकाळी 7.20 वाजता गुन्हा दाखल झाला.









Post a Comment

0 Comments