Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

गाव स्वच्छतेत संत संप्रदायाचे योगदान महत्त्वाचे - शिवानंद टाकसाळे





परभणी ➡️ गावे स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिक मुक्त होण्यासाठी संत गाडगे महाराज, तुकडोजी महाराज या संतांप्रमाणे ग्रामीण भागातील संत संप्रदायाचे योगदान देखील महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केले. ते दिनांक 31 जानेवारी 2021 रोजी परभणी तालुक्यातील ब्राह्मणगाव या ग्रामपंचायतीमध्ये आयोजित पल्स पोलिओ आणि स्वच्छता संवाद  कार्यक्रमाला संबोधित करताना केली.



यावेळी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी शंकरराव देशमुख, गट विकास अधिकारी अनुप पाटील, जिल्हा परिषद सदस्य जनार्दन सोनवणे, विस्तार अधिकारी जी एम गोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. जुनेद, डॉ. यादव, एम आर वाघमारे, शब्बीर खान ग्राम विकास अधिकारी अंगद दुधाटे, स्वच्छ भारत मिशन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी शाळा, अंगणवाडीची पाहणी करून अंगणवाडी ताईंचे कौतुक केले तसेच वृक्षारोपण कार्यक्रम आणि प्लास्टिक मोहीम  राबविण्यात आली. टाकसाळे यांनी  गावातील नागरिकांशी संवाद साधला ते म्हणाले की, गावामध्ये धार्मिक दृष्टीने लोक बांधील असतात त्यामुळे स्वच्छतेच्या कार्यात संतांनी योगदान दिले तर खेडी - पाडी निर्मल होण्यासाठी नक्की मदत होऊ शकेल.

गावातील उघड्यावरची हागणदारी आणि प्लास्टिकचा अति वापर तसेच गावातील रस्ते, नाल्यांची अस्वच्छता यामुळे डेंग्यू, हत्तीरोग, मलेरिया, चिकन गुण्या, टाइफाइड, कॉलरा या सारखे भयंकर रोग बळावत आहेत, उघड्यावरच्या हागनदारीमुळे जनावरांना संसर्गजन्य आजार उद्भवत आहेत, युवकांचे आरोग्यमान ढासळत आहे, ही परिस्थिती खूप भयानक आहे. त्यामुळे आपण वेळीच जागरूक होणे गरजेचे आहे.

यासाठी प्रत्येक गावातील युवक मंडळी आणि ज्येष्ठ नागरिकांनी आपसातील मतभेद विसरून संघटित होऊन गाव स्वच्छतेसाठी आठवड्यातून एक तास श्रमदान करण्याचे आवाहन यावेळी शिवानंद टाकसाळे यांनी केले. तसेच यापुढे जे नागरिक समज देऊनही उघड्यावर शौचास जातील त्यांच्या विरुद्ध योग्य ती कारवाई करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी संबंधित आधिकाऱ्या दिली.




Post a Comment

0 Comments