Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

जिल्ह्यात पल्स पोलिओ कार्यक्रम उत्साहात संपन्न, परभणी शहरातील 56 हजार मुलांना होणार त्याचा लाभ







परभणी ➡️ जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या हस्ते पल्स पोलिओ मोहिमेचा आज शुभारंभ करण्यात आला. तर परभणीत शहर महानगरपालिकेच्या वतीने 0 ते 5 वयोगटातील बालकांना पोलिओचा डोस उपमहापौर भगवान वाघमारे, स्थायी समितीचे सभापती गुलमीर खान व उपायुक्त प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते पल्स पोलिओ डोस देण्यात आला.

जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आयोजित कार्यक्रमाच्या वेळी  डॉ. किशोर सुरवसे, डॉ प्रकाश डाके, डॉ जिकरे, डॉ सुदेवड, अलका आखाडे, सुजाता कांबळे, श्रीमती दास, श्रीमती लेमाडे आदि उपस्थित होते. तर शहर महानगरपालिकेच्या वतीने 0 ते 5 वयोगटातील बालकांना पोलिओचा डोस उपमहापौर भगवान वाघमारे, स्थायी समितीचे सभापती गुलमीर खान व उपायुक्त प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते पल्स पोलिओ डोस देण्यात आला. यावेळी नगरसेवक सचिन देशमुख, गटनेते चंद्रकांत शिंदे, सौ.मंगल मुद्गलकर, आयएमएचे अध्यक्ष डॉ.अनिल कान्हे, सचिव डॉ.संजय खिल्लारे, आरोग्य अधिकारी डॉ.कल्पना सावंत, डॉ.आरती देऊळकर, डॉ.कलीमा बेग, समन्वयक गजानन जाधव, अंतर्गत लेखाधिकारी भगवान यादव, संकीर्ण विभागप्रमुख राजकुमार जाधव,अमोल काटुके, अमोल सोळंके, जोगदंड आदीची उपस्थिती होती. उद्घाटन प्रसंगी भगवान वाघमारे यांनी शहरातील 0 ते 5 वयोगटातील बालकांना पल्सपोलिओच्या उद्घाटन प्रसंगी शहरामध्ये महापालिकेच्या वतीने 220 बुथ शहरात आहेत. 0 ते 5 वयोगटातील 56 हजार बालकांना पल्स पोलिओ देण्याचे उदिष्ट आहे. 

शहरामध्ये अंगणवाडी, बसस्थानक,रेल्वेस्टेशन, दर्गा, शहरातील टोलनाके, सर्व रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, वीट भट्टा, विविध ठिकाणी महापालिकेच्या वतीने उपाययोजना केल्या आहेत. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ.कल्पना सावंत म्हणाल्या, शहरात प्रत्येक बुथवर पाच जणांची नेमणुक केली आहे. त्यामध्ये अंगणवाडी ताई, आशा वर्कर, महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी व आरोग्य कर्मचा-यांकडून 220 बुथवर पल्स पोलिओ लस देण्याचे काम सुरू आहे. तसेच शहरात मोबाईल व्हॅन फिरत आहेत. तसेच सन्मानीय सदस्यांच्या हस्ते प्रत्येक प्रभागाचे पल्स पोलिओ मोहिमचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी उपायक्त प्रवीण गायकवाड यांनी शहरातील सर्व बुथवर भेट देवून आढावा घेतला. प्रत्येक बुथवर कर्मचारी उपस्थित होते. 0 ते 5 वयोगटातील बालकांना पल्स पोलिओचे डोस देण्यात येत होते. यावेळी शहरातील बचतगट महिला, खासगी हॉस्पीटल, शाळा या ठिकाणी बुथची व्यवस्था केली होती. महानगरपालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी या मोहिमेत सहभाग नोंदविला. 220 बुथवर 220 कर्मचारी मनपाचे नियक्त केले आहेत. त्यामध्ये अंगणवाडीताई व सेविका तसेच आशा वर्कर यांची नेमणुक केली होती. परिचारिकेच्या सहाय्याने पल्स पोलिओचा डोस बालकांना देण्यात आला. जायकवाडी येथील महानगरपालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रात उपायुक्त प्रवीण गायकवाड यांनी आपल्या मुलीस पल्स पोलिओचा डोस दिला.







Post a Comment

0 Comments