Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

"महाकृषी ऊर्जा अभियान 2020" शेतकऱ्यांना नवसंजीवनी देणारे अभियान- मुख्य अभियंता पडळकर





💢महावितरण : महाकृषी ऊर्जा अभियान २०२० कृषीपंपाच्या थकीत रकमेवरील विलंब आकार माफ व व्याजदरात सवलत

💢 शेतकऱ्यांनी अभियानाचा लाभ घेण्याचे महावितरणचे अवाहन

नांदेड ➡️ ऊर्जा विभागाच्या वतीने प्रजासत्ताक दिनापासून राज्यभरात सुरू करण्यात आलेले महा कृषी ऊर्जा अभियान 2020 हे खऱ्या अर्थाने शेकऱ्यांसाठी नवसंजीवनी देणारे ठरणार आहे. या अभियाना अंतर्गत वीजजोडणीच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना नवीन वीज जोडणी तसेच थकबाकीदार शेतकऱ्यांना थकबाकी मुक्त करण्यासाठी थकीत रकमेवरील विलंब आकार माफ व व्याजामध्ये सवलत मिळणार आहे. त्यामुळे या अभियानाचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घेण्याचे अवाहन नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री दत्तात्रय पडळकर यांनी केले आहे.

महावितरणच्या मुदखेड उपविभागा अंतर्गत येणाऱ्या मौजे आम्राबाद येथे (दि.30) आयोजीत मेळाव्यामध्ये महाकृषी ऊर्जा अभियान 2020 ची सविस्तर माहिती उपस्थित ग्रामस्थांना देताना मुख्य अभियंता श्री पडळकर म्हणाले की, शेतकऱ्यांच्या विजपुरवठयाच्या विविध अडचणींचा अभ्यास करून शेतकऱ्यांना शाश्वत शेती करता यावी या उद्देशाने या नवीन अभियानाची सुरवात करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत 30 मीटरच्या आत असलेल्या सर्व कृषीग्राहकांना तात्काळ वीज जोडणी देण्यात येणारआहे. तसेच ज्या कृषीपंप अर्जदाराचे अंतर लघुदाब वाहिनीच्या 200 मीटर आत आहे व रोहित्रावर पर्याप्त क्षमता उपलब्ध आहे अशा नवीन कृषीपेप ग्राहकांना 03 महिण्याच्या आत नवीन जोडणी देण्यात येईल. 200 ते 600 मीटरच्या आत असलेल्या कृषीग्राहकांना उच्चदाब वितरण प्रणालीचा पर्याय उपलब्ध असणार आहे. 

नवीन वीजजोडणीसोबतच कृषीपंप वीज देयक सवलत धोरण राबविले जात आहे. 05 वर्षापुर्वीच्या म्हणजेच सप्टेंबर 2015 पुर्वीच्या कृषीपंप थकबाकीवरील विलंब आकार व व्याज माफ करण्यात येणार आहे तसेच पाच वर्षापर्यंतच्या म्हणजेच सप्टेंबर 2015 पर्यंतच्या थकबाकी वरील संपुर्ण विलंब आकार माफ होईल तसेच  सवलत देण्यात येईल. त्यामुळे थकबाकीदार कृषीपंप ग्राहकांनी या संधीचा लाभ घेवून अख्ये गाव थकबाकी मुक्त करावे असे अवाहनही केले. या थकबाकीतून मिळणारा 33 टक्के पैसा हा संबंधीत ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या वीजयंत्रणेच्या देखभाल दुरूस्तीवरच खर्च करण्यात येणार आहे असे ही श्री पडळकर यांनी सांगीतले. या अभियाना अंतर्गत नांदेड परिमंडळातील 29 जानेवारीपर्यंत 244 शेतकऱ्यांना नवीन वीज जोडणीही देण्यात आली आहे त्याचबरोबर थकबाकीदार कृषीपंपधारकांनी 01 कोटी 17 लाख रूपयांची थकबाकी भरून महा कृषी ऊर्जा अभियान 2020 चा लाभ धेण्यात आल्याचे ही मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकरांनी सांगीतले.

या प्रसंगी नांदेड ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री आर.पी.चव्हाण यांनीही ग्रामस्थांना अभियाना संदर्भात माहिती दिली. सदरील मेळावा यशश्वीकरण्यासाठी उपविभागीय अभियंता पंकज देशमुख तसेच लेखा विभागाचे अधिकारी, जनमित्र यांनी परिश्रम घेतले.




Post a Comment

0 Comments