Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणीत कोरोना योद्धाच्या सन्मानार्थ फिट इंडिया सॅक्लोथॉन रॅली आयोजित





परभणी ➡️ येथील ग्लोब स्पोर्ट्स अकादमीकडून 31 जानेवारी सकाळी 7.30 वाजता रोजी कोरोना युध्दाच्या सन्मानार्थ "फिट इंडिया सॅक्लोथॉन" रॅलीचे आयोजन केले. या रॅलीचे आयोजनाचा उद्देश लोकांमध्ये फिटनेसच्या प्रती जागृती निर्माण करणे आहे, असे मत ग्लोब स्पोर्ट्स अकादमी जनरल सेक्रेटरी सय्यद शकील यांनी सांगितले. 

कोराना योद्धा म्हणून आपले योग्यदान देणारे पोलिस आधिकारी, डॉक्टर, आशा कर्मचारी, मीडियातील लोकांचे आभार मानले गेले. त्याच्यामुळे लोकांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यास मदत झाली. त्याच्या सन्मानार्थ या रॅलीचे आयोजन केले गेले. ही रॅली सकाळी 7.30 वाजता ईदगाह मैदाना पासून ते 05 किलोमीटर पर्यंत काढण्यात आली. यावेळी नगरसेवक सुनील देशमुख, एमबीएचे प्रमुख मिर्ज़ा तनवीर बैग, तुराब खान, अमर चाउस, मुजाहिद अहमद खान, शैख़ नूर, जफ़र खान आदी उपस्थित होते.






Post a Comment

0 Comments