Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

केंद्र शासनाद्वारे परभणी शहर ओडीएफ प्लसप्लस घोषित






परभणी
➡️ शहर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत मिशनतंर्गत ओडीएफ प्लसप्लस मध्ये सहभाग नोंदविला होता. केंद्र शासनाच्या पथकाद्वारे करण्यात आलेल्या तपासणीत परभणी शहर महानगरपालिकेस उत्तम गुण मिळाले असून शहर ओडीएफ प्लसप्लस म्हणून घोषीत करण्यात आले आहे, अशी माहिती आयुक्त देविदास पवार व स्वच्छ सर्वेक्षण 2021 चे व्यवस्थापक तन्वीर मिर्झा बेग, उपायुक्त प्रदीप जगताप, प्रवीण गायकवाड यांनी दिली.

दि. 28 जानेवारी रोजी परभणी शहर हे ओडीएफ प्लसप्लस म्हणजेच हागणदारी मुक्त प्लसप्लस शहर केंद्र शासना मार्फत घोषीत करण्यात आले. परभणी शहराने  स्वच्छ भारत मिशन मध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे. या अभियानातंर्गत परभणी शहर महानरपालिकेने शहरातील स्वच्छता सुधरण्या करिता  सामुदायिक व सार्वजनिक शौचालयाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याच बरोबर मैला व्यवस्थापनासाठी  महानगरपालिकेने बोरवंड येथे मैला व्यवस्थापन केंद्र उभारले आहे. त्या ठिकाणी शहरातील शौचालय मधील मैल्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. महानगरपालिकेमार्फत उपलब्ध करण्यात आलेल्या या पायाभूत सुविधांची तपासणी केंद्र शासनाच्या पथका मार्फत करण्यात होती. या चाचणी मध्ये परभणी शहर उतम गुणाने उत्तीर्ण झाले असून गुरूवारी(दि.28) रोजी शहर ओडीएफ प्लसप्लस म्हणून घोषीत झाले आहे.

शहर ओडीएफ प्लसप्लस येण्यासाठी खासदार संजय जाधव, आमदार सुरेश वरपूडकर, आमदार डॉ.राहूल पाटील, महापौर सौ.अनिताताई रविंद्र सोनकांबळे, उपमहापौर भगवानराव वाघमारे, सभागृह नेते सय्यद समी उर्फ माजू लाला, स्थायी समितीचे सभापती गुलमीर खान, विरोधी पक्षनेते विजय जामकर, गटनेते चाँदसुभाना जाकेर लाला, सौ.मंगल मुद्गलकर, चंद्रकांत शिंदे, सन्मानीय सदस्य तसेच सहाय्यक आयुक्त शिवाजी सरनाईक, संतोष वाघमारे, श्रीकांत कांबळे, मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, स्वच्छता निरीक्षक मेहराज अहेमद, विकास रत्नपारखे, श्रीकांत कु-हा, शेख शादाब, नयनरत्न घुगे, लक्ष्मण जोगदंड, शहर अभियंता वसीम पठाण, स्वच्छ सर्वेक्षणचे सिध्दी पेडणेकर, तुराब खान तसेच भांडार विभाग प्रमुख रामेश्‍वर कुलकर्णी, एलयूएनएम विभागाचे व्यवस्थापक सुभाष मस्के, इफ्तेयार खान पठाण, आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.कल्पना सावंत,सोहेल समी, गार्डन विभागाचे प्रमुख मोहम्मद अथर, पवन देशमुख यांचे सहकार्य लाभले. 

 



Post a Comment

0 Comments