Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

इटोली येथे जिल्हास्तरीय वक्त्तृत्व स्पर्धा संपन्न





परभणी
➡️ आज जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा इटोली ता.जिंतूर व जिल्हा परिषद (शिक्षण विभाग)परभणी यांच्या संयुक्तविद्यमाने तसेच डाॕ. सुचिता पाटेकर (प्राथमिक शिक्षणाधिकारी परभणी) यांच्या प्रेरणेने इटोली येथे आॕन लाईन जिल्हास्तरीय वक्त्तृत्व स्पर्धा संपन्न झाली.

या स्पर्धेतील वयोगट इयत्ता 01 ली ते 04 थी व इयत्ता 05 वी ते 07 वी  असा होता. या स्पर्धेमध्ये एकूण 235 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आणि सर्वांचा उत्स्फूर्तपणे संपूर्ण जिल्ह्यातून प्रतिसाद मिळाला. या कामी सुभाष आमले (गटशिक्षणाधिकारी पं.स.जिंतूर), गजानन वाघमारे (जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पं.स.जिंतूर), शिवाजी क-हाळे (केंद्रप्रमुख), भास्कर जुमडे (मुख्याध्यापक) यांचे सहकार्य लाभले.  

तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी रत्नमाला तोडकर ,मनोज तोडकर,ज्ञानेश्वर हाके,परमेश्वर मेनकुदळे,भास्कर चव्हाण, कौशल्या नागरगोजे,मीरा दाडगे व अनिता भस्मारे आदिंनी परिश्रम घेतले.




Post a Comment

0 Comments