Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

जीवे मारण्याचा प्रयत्न करणारांना 07 आरोपींना 02 वर्षांची शिक्षा





परभणी
➡️ शेतीच्या वादावरून महिलेस डोक्यात कुर्‍हाड मारून जखमी करीत विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या 07 
जणांना चौथे जिल्हा व सत्र न्यायाधीश ओंकार देशमुख यांनी 02 वर्ष चांगल्या वर्तणुकीच्या बंधपत्रासह 01 हजार रुपये प्रत्येकी दंडाची शिक्षा गुरुवारी (दि.28) सुनावली. ही दंडाची रक्कम फिर्यादीस देण्याचेही आदेशात नमूद केले.

या प्रकरणाची अधिक माहिती अशी, की पाथरी पोलिस ठाण्यात जिकरौस सिंधू यांनी एक तक्रार दिली, की शेतीच्या वादावरून त्यांच्यासह त्यांच्या कुटूंबियांना लक्ष्मण सहजराव व इतर 06 जणांनी मारहाण करीत विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यात आपल्याला कुर्‍हाडीने जबर मारहाण केली. त्यात डोक्यास जखम झाली असून विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केअसल्याचे नमूद केले. 

या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक मानकर यांनी करून न्यायालयात दोषारोप दाखल केले होते. सरकारी वकील अ‍ॅड. डी.यु. दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक सरकारी वकील अ‍ॅड. आनंद एन. गिराम यांनी बाजू मांडली. या प्रकरणाचा गुरुवारी (दि.28) चौथे जिल्हा व सत्र न्यायाधीश ओंकार देशमुख यांनी निकाल दिला. त्यात 07 आरोपींना दोषी धरून 15 हजार रुपयांच्या जामीनावर व दोन वर्ष चांगल्या वर्तणुकीच्या बंधपत्रावर तसेच प्रत्येक एक हजार रुपये दंड नुकसान भरपाई म्हणून फिर्यादी महिलेस एकुण सात हजार रुपये देण्याचे आदेश दिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून शिवशंकर मनाळे व कौर पैरवी अंमलदार म्हणून पाथरी पोलिस ठाण्याचे कर्मचारी हरी गायकवाड यांनी काम पाहिले.




Post a Comment

0 Comments