Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत चित्रकला, निबंध स्पर्धेचे आयोजन





नांदेड ➡️ रस्ता सुरक्षा अभियान 2021 च्या निमित्ताने प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने जिल्हयातील शालेय विद्यार्थी, नागरिकांसाठी चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा नांदेड जिल्हयातील सर्व शालेय विद्यार्थी व नागरिकांसाठी खुली असून स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक दिले जाणार आहे. जिल्ह्यातील इच्छूक विद्यार्थी व नागरिकांनी या स्पर्धेसाठी आपले निबंध व चित्र बुधवार 10 फेब्रुवारी 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत जमा करुन सहभाग नोंदवावाअसे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे. 

स्पर्धेसाठी गट व विषय पुढील प्रमाणे राहतील. चित्रकला स्पर्धेत छोटा गट इयत्ता ते 7 पर्यंत- वाहतुकीचे नियम पाळाअपघात टाळा. मध्यम गट इयत्ता 8 वी ते दहावी पर्यत- अपघातग्रस्तास मदत करा. खुला गट- सडक सुरक्षा जीवन रक्षा. निबंध स्पर्धेत खुला गट (सर्वांसाठी) अपघातमुक्त राष्ट्रासाठी आवश्यक उपाययोजना हा विषय राहिल. 

या स्पर्धेच्या अटी व शर्ती पुढील प्रमाणे आहेत. निबंध व चित्रकला स्पर्धेतील इच्छूक स्पर्धेकांनी त्यांना दिलेल्या विषयावरील आपला निबंध व चित्र आपले पूर्ण नाव, पत्ता व मोबाईल क्रमांकासह पोष्ट, ईमेलद्वारे किंवा प्रत्यक्ष प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड या कार्यालयात बुधवार 10 फेब्रुवारी 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत जमा करावेत. संपर्कासाठी पत्ता व ईमेल पुढीलप्रमाणे आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयप्लॉट क्र. पी-149, एमआयडीसी, सिडको, नांदेड-431603 दूरध्वनी क्र. 02462-259900 ई-मेल roadsafetynanded@gmail.com आहे. या स्पर्धेचे सर्वाधिकार प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांच्याकडे राहतील. सदर निबंध  चित्रकला स्पर्धेमध्ये जास्तीत विद्यार्थी  नागरिकांनी सहभाग नोंदवावाअसे आव्हान करण्यात आले आहे.




Post a Comment

0 Comments