Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

जिल्हा परिषद पदवीधर कर्मचारी संघटनने केले विभिन्न मागण्यासाठी आंदोलन





परभणी ➡️ राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी मध्यवर्ती महासंघाने विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपात जिल्हा परिषद पदवीधर कर्मचारी संघटनेने (वर्ग चार) शुक्रवारी (दि.29) लाक्षणीक संप करीत निदर्शने केली.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन लांडगे, उपाध्यक्ष गजानन इंगळे, सदानंद शिवपुजे, कार्याध्यक्ष चंदाताई खंदारे, सचिव रामदास बोडखे, कोषाध्यक्ष डुमलवाड यांच्यासह पदाधिकार्‍यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांना शुक्रवारी एक निवेदन सादर करीत चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य संघटनेने पुकारलेल्या संपात सहभागी होत असल्याचे नमूद केले. 

या निवेदनात जिल्हा परिषदेतील सरळसेवेतील वर्ग चारच्या कर्मचार्‍यांना अनुकंपा व ग्रामपंचायत कर्मचार्‍यांप्रमाणे शैक्षणीक पात्रतेनुसार वर्ग तीनच्या सर्व पदावर पदोन्नती मिळावी यात आरोग्य सेवक, ग्रामसेवक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, पशुधन पर्यवेक्षक आदींबाबत हा विचार व्हावा, असे म्हटले असून 05 मे 2016 च्या ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार वर्ग चारमधून वर्ग तीन लिपीकपदी 25 टक्के कोटा 50 टक्के करून (पदोन्नती प्रमाण 40-50-10) असा करावा, वर्ग चारच्या रिक्त जागा कंत्राटी पध्दतीने न भरता सरळसेवेने भराव्यात, वर्ग चार कर्मचारी वैद्यकीय कारणास्तव अपात्र ठरल्यास त्यांच्या एका पाल्यास सेवेत घ्यावे, पहिल्या कालबध्द पदोन्नतीमध्ये कनिष्ठ सहाय्यकांचे वेतनश्रेणी द्यावे, आरोग्य विभागातील वर्ग चारची 25 टक्के पदे कमी करण्यात येऊ नयेत, जिल्हा परिषद वर्ग चार कर्मचार्‍यांना शैक्षणिक पात्रतेनुसार विभागीय परीक्षा देण्याची परवानगी द्यावी, वर्ग चारला वैद्यकीय देयक प्रतीपुर्तीऐवजी कार्डलेस अथवा कॅशलेस सुविधा प्रणाली सुरू करावी, जिल्हा परिषद वर्गह चारला धुलाई भत्ता दरमहा 50 रुपये वरून 500 रुपये मंजुर करावा, सर्व पंचायत समिती व प्राथमिक आरोग्य केंद्रात चौकीदार, पहारेकरी यांची पर्यायी व्यवस्था करावी, अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुन्ही पेंशन योजना लागू करावी, वर्ग चारच्या कर्मचार्‍यांना घरबांधणी अग्रीम देण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश करण्यात आला.




Post a Comment

0 Comments