Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

सेलूत युवकाचा विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न





परभणी ➡️ सेलू तालुक्यातील डिग्रस वाडी येथील एका युवकाने सेलू शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी (दि.28) रात्री 7.30 वाजता  घडली. त्याच्यावर ओढावलेल्या आपबीतीची माहिती फेसबुकवर टाकत त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार सेलू तालुक्यातील डिग्रस वाडी येथील  बालकृष्ण सुंदरराव लेवडे असे आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या युवकाचे नाव असून गुरुवारी रात्री 7.30 वाजता जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा देत काही व्यक्तींच्या नावांचा उल्लेख करीत मी सर्वांना सोडून जात आहे, असे म्हणत विष प्राशन केले. त्यानंतर बालकृष्ण लेवडे यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून परभणी येथील एका खासगी रुग्णालयात पुढील उपचारार्थ दाखल करण्यात आले. बालकृष्ण लेवडे यांचे मोठे भाऊ अनंत लेवडे यांनी 05 ऑगस्ट 2018 रोजी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर बलिदान दिले होते. परभणीच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून बालकृष्ण लेवडे यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती सेलू पोलिसांनी दिली.




Post a Comment

0 Comments