Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

जिंतूर रँडोनिअर्सच्या वतीने अंजली कोलाचा भव्य नागरी सत्कार कार्यक्रम रविवारी




परभणी ➡️ जिंतूर तालुक्याची मान संबंध जगाच्या पाठीवर उंचावणाऱ्या मिसेस एशिया युनिव्हर्स 2021 च्या मानकरी अंजली कोला-पोर्जे ह्या जिंतूरच्या लेकीचा जिंतूर रँडोनिअर्स सायकल क्लबच्या वतीने रविवार 31 जानेवारी रोजीमराठवाड्यातील नामवंत अधिकारी राहणार उपस्थित मैनापुरी मंगल कार्यालयात दुपारी 2 वाजता भव्य नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. सत्कार समारंभासाठी मराठवाड्यातील नामवंत अधिकारी उपस्थित राहणार आहे.

शहरातील सामान्य कुटुंबात जन्मलेल्या अंजली कोला-पोर्जे हिने प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर आत्मविश्वास उराशी बाळगून कुटुंबाच्या सहकार्याने आंतराष्ट्रीय स्तरावर देण्यात येणाऱ्या मिसेस एशिया युनिव्हर्स 2021च्या खिताबावर स्वतःचे नाव कोरल्याने जगाच्या पाठीवर जिंतूर तालुक्याच्या नावलौकिकात मानाचा तुरा रोवला गेला आहे. अंजली कोलाच्या या अद्वितीय यशाचे कौतुक करण्यासाठी नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या जिंतूर रँडोनिअर्स सायकल क्लबच्या वतीने जिंतूरच्या लेकीचा रविवार 31 जानेवारी रोजी मैनापुरी मंगल कार्यालयात दुपारी 2 वाजता भव्य नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षक डॉ प्रभाकर बुधवंत यांची उपस्थिती राहणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून मिस इंडिया फायनॅलिस्ट तथा पोउपनी दामिनी पथकप्रमुख पल्लवी जाधव, शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, जिल्हा कोषागार अधिकारी ज्योती बगाटे, सायकलिस्ट रेखा रावले, युवारत्न किरण गीते, वाशिम रँडोनिअर्स प्रतिनिधी चेतन शर्मा आदींची उपस्थिती राहणार आहे. या नागरी सत्कार समारंभास शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान जिंतूर रँडोनिअर्स सायकल क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.




Post a Comment

0 Comments