Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

नांदेड - पनवेल विशेष रेल्वेस एक महिन्याची मुदतवाढ





परभणी
➡️ नांदेड - पनवेल - नांदेड या विशेष रेल्वेस एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली असून या गाडीच्या वेळेत बदल करण्यात आला असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेने एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली. नांदेड - पनवेल - नांदेड या विशेष रेल्वेस एक महिन्याची वाढ देण्यात आली असून वेळेत बदल करण्यात आला असल्याचे नमूद करीत या रेल्वेतून आरक्षणाशिवाय प्रवास करता येणार नसल्याचेही म्हटले आहे. 

नांदेड ते पनवेल (क्र.07614) ही विशेष रेल्वे दिनांक 30 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर अशी मुदत वाढ देण्यात आली असून ही विशेष रेल्वे 30 नोव्हेंबरपासून नव्या वेळेनुसार धावणार असल्याचे म्हटले आहे. नांदेड  रेल्वे स्थानकावरून सायंकाळी  साडेपाच वाजता सुटणार असून पूर्णा येथे सहा वाजता, परभणीत सहा वाजून 32 मिनिटांनी, परळीत साडेआठ वाजता, तर पुणे येथे दुसर्‍या दिवशी सकाळी सहा वाजून 20 मिनिटांनी तर तेथून पुढे पनवले येथे सकाळी नऊच्या सुमारास पोचणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

पनवेल ते नांदेड (क्र.07613) ही विशेष रेल्वेस दिनांक 1 डिसेंबर  ते 31  डिसेंबर, 2020 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली असून हि गाडी दिनांक 1 डिसेंबरपासून बदलेल्या वेळेनुसार धावणार आहे. पनवेल रेल्वे स्थानकावरून दुपारी चार वाजता सटणार आहे. पुणे येथे साडेसात वाजता, परळीत दुसर्‍या दिवशी सकाळी पाच वाजून 50 मिनिटांनी, परभणीत सहा वाजून 52 मिनिटांनी, पूर्णेत साडेसात वाजता, नांदेड येते पावणे नऊ वाजता पोचेल, असे दक्षिण मध्य रेल्वेने म्हटले आहे.




Post a Comment

0 Comments