Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणी आजचा दिवस विविध संघटनांच्या संप, मोर्चा व आंदोलनांनी गाजला




परभणी 

परभणी ➡️ जिल्ह्यात कामगारांच्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या भारत बंद मध्ये विविध संघटना, शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालयासह खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत बंद यशस्वी केला. यात परभणीत भाकपच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी सकाळी मोर्चा काढण्यात आला, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवती संघटनेची निदर्शने, आंदोलनात बीएसएनएलमधील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता तर परभणी शहरात मनसेकडून वीज बिलांच्या विरोधात मनसेचा जोरदार मोर्चा काढला. सेलूत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. तसेच गंगाखेड येथे हमाल मापाडी मजदूर युनियन शाखा गंगाखेडच्या वतीने तहसील कार्यालय येथे मोर्चा काढण्यात आला. 

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवती संघटनेची निदर्शने

परभणी ➡️ राज्य सरकारी कर्मचारी मध्यवती संघटनेने  विविध मागण्यांसाठी आज  देशव्यापी लाक्षणिक संपात सहभाग नोंदवून परभणीत जिल्हा कचेरीसमोर निदर्शने केली. यात दिलेल्यानंतर निवेदनात  सर्वांना 1982 ची जुनी पेन्शन योजना लागु करा. खाजगीकरण / कंत्राटीकरण धोरणे रद्द करुन सध्याच्या अंशकालीन व कंत्राटी कर्मचा-यांच्या सेवा नियमित करा. मुदतपूर्व सेवानिवृत्तीचे जाचक धोरण रद्द करा. कामगार-कर्मचा-यांना देशोधडीला लावणारे नवीन कामगार कायदे रद्द करा. केंद्रीय कर्मचा-यांना देय ठरणारे सर्व भत्ते राज्य कर्मचा-यांना मंजुर करा या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन सरकारी कर्मचा-यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष मंगेश किसनराव जोशी, सचिव प्रशांत सिरस, बी.आर.राठोड यांच्यासह पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होते.


बीएसएनएलच्या कर्मचार्‍यांची परभणीत जोरदार निदर्शने

परभणी ➡️ आपल्या विविध मागण्यांसाठी विविध संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपादरम्यान बीएसएनएलच्या कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी - कर्मचार्‍यांनी गुरुवारी (दि.26) जोरदार निदर्शने केली.

प्रशासकीय इमारतीजवळील बीएसएनएलच्या कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर  गुरुवारी सकाळी साडेअकरा ते एकच्या सुमारास कर्मचार्‍यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्याव्दारे सरकारच्या धोरणांचा निषेध केला. यावेळी छोटेखानी सभेत एस.बी.सूर्यवंशी व एच.एम. कुलकर्णी या दोघांनी मार्गदर्शन केले. निदर्शनकर्त्यांनी बीएसएनएलची फोरजी सेवा तात्काळ सुरू करावी, व्हीआरएस घेतलेल्या अधिकारी - कर्मचार्‍यांना जून 2020 पर्यंत सर्व रक्कम द्यावयाचे मान्य केले होते, ते आश्वासन तात्काळ पूर्ण करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनात. संजय ढोबळे, ए.एम. बेग, पी.ए. खान, नारायण जोगदंड, लक्ष्मण वरकड, यशवंत चौधरी, गोपाळ पतंगे, अजीत शेंडे, श्रीमती सालेहा बेगम आदी सहभागी झाले होते.

वीजबिलांच्या विरोधात मनसेचा जोरदार मोर्चा

परभणी ➡️ लॉकडाऊनसह अनलॉकच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना अव्वा की सव्वा बिले वितरित करणार्‍या वीज वितरण कंपनीच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी गुरूवारी (दि.26) जोरदार मोर्चा काढला.

जिल्हाध्यक्ष रुपेश देशमुख, जिल्हाध्यक्ष शेख राज, जिल्हाध्यक्ष गणेश सुरवसे, जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी, जिल्हा संघटक गुलाबराव रोडगे, राहूल कनकदंडे, वृषाली परिहार, गणेश भिसे, लक्ष्मणराव रेंगे, यादव महात्मे, अर्जुन टाक यांच्यासह अन्य पदाधिकारी - कार्यकर्त्यांनी गुरुवारी जोरदार घोषणाबाजी करीत संपूर्ण बाजारपेठ दणाणून सोडली. कोरोनासारख्या आपत्तीच्या काळात मोठमोठ्या रकमेची वीज बिले सर्वसामान्यांच्या माथी मारली. वीज बिले भरण्याबाबत सक्ती सुरू केली. झिझिया करासारखी आकारणी करीत या सरकारने ग्राहकांना सळो की पळो करून सोडले, असा आरोप मोर्चेकर्‍यांनी केला. उर्जामंत्र्यांची भेट घेतल्यानंतरसुध्दा काही सकारात्मक पावले उचलल्या जातील, असे अपेक्षित होते. परंतु शंभर युनिटपर्यंत वीजदेयकांमध्ये सवलत देऊ, अशी भाषा करणार्‍या उर्जामंत्र्यांनी घुमजाव केला. वीज बिले भरलीच पाहिजेत, कोणतीही सवलत मिळणार नसल्याची भाषा सुरू केली. त्यामुळेच सर्वसामान्य नागरिकांचा संयम सुटला आहे, असे मोर्चेकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना सादर केलेल्या निवेदनातून नमुद केले. काही झाले तरी ही वाढीव वीज बिले भरू नका, असे आवाहनही यावेळी नागरिकांना केले. असा असहकार पुकारल्याशिवाय सरकारलाही जनततेतील असंतोष जाणवणार नाही, सरकार तुमच्या विजेची जोडणी तोडू शकत नाही आणि जर तसा प्रयत्न केला तर मनसे स्टाईल उत्तर दिले जाईल, असाही इशारा या मोर्चेकर्‍यांनी दिला.

भाकप व आयटकचा मोर्चा धडकला

परभणी ➡️ केंद्र सरकारच्या आर्थिक आणि कामगार-कर्मचारीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ विविध कामगार संघटनांनी आज दि.26 नोव्हेंबर रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. परभणीत आयटक व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात भाकपचे सरचिटणीस कॉ.राजन क्षीरसागर, कॉ.ऍड.माधुरी क्षीरसागर, ऍड.लक्ष्मण काळे, कॉ.शेख अब्दुल, कॉ.मुगाजी बुरूड, कॉ.आसाराम बुधवंत यांच्यासह आशा स्वयंसेविका, गतप्रवर्तक, बीसीएम, शालेय पोषण आहाराचे कर्मचारी तसेच डेटा एन्ट्री ऑपरेटर,  महिला व पुरुष कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


सेलूत माकपचे आंदोलन

सेलू ➡️ केंद्रातील मोदी सरकारच्या कामगार शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात घोषणाबाजी करत गुरुवारी (ता.26) मार्कवादी कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करावेत, कामगार विरोधी कायद्यातील बदल रद्द करावेत, तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असल्याने तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करुन नुकसान भरपाई एकरी 50 हजार रुपये द्यावी, सर्व गरीबांना 02 रुपये किलोचे पिवळे रेशनकार्ड द्यावे, रेशनकार्डाचे विभक्तीकरण करावे, कोरोना काळातील विजबिल माफ करण्यात यावे तसेच, इन्कमटॅक्स न भरणाऱ्या सर्व कुटुंबांना दरमहा 7 हजार पाचशे रुपये निर्वाह भत्ता देण्यात यावा अशा विविध या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांना देण्यात आले. आंदोलनात रामेश्वर पौळ, रामकृष्ण शेरे, नारायण पवार, रोहीदास हातकडके, भास्कर कदम, शांतीराम पौळ, शिवाजी रणखांबे, दिलीप दौड, खंडू चव्हाण यांच्यासह नगर परिषद कामगार व शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.


हमाल माथाडी मजदूर युनियनचा भारत बंदमध्ये सहभाग

गंगाखेड ➡️ केंद्र शासनाने शेतीमालाच्या किफायतशीर भावाचा हिरावून घेण्यासाठी चालवलेल्या शेतीमाल विक्री कायदा २०२० व अत्यावश्यक वस्तू कायदा २०२० कंत्राटी शेती कायदा प्रस्तावित विजबिल कायदा यासह विविध मागण्यांसाठी हमाल मापाडी मजदूर युनियन शाखा गंगाखेडच्या वतीने भारत बंदमध्ये सहभाग नोंदवून तहसील कार्यालय येथे (ता.२६) रोजी मोर्चा काढला. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाल माथाडी कामगारांसाठी असणाऱ्या माथाडी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, असा उल्लेख नियोजनावर केला. निवेदनावर शिवाजी कदम, शेख सरवर, रोहीदास बदाले, रमेश वाव्हळे, लाला साळवे, दारासिंग परकड, चंद्रकांत जाधव, परमेश्वर जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.





Post a Comment

0 Comments