Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

इटोली येथे फेसबुक लाईव्ह कार्यक्रम संपन्न





जिंतूर
➡️ जिंतूर तालुक्यातील इटोली येथे शनिवार रोजी जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळेत क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांना त्रिवार अभिवादन करत परभणी जिल्ह्याचे मुख्यकार्यकारी अधिकारी बी.पी.पृथ्वीराज सर यांच्या प्रेरणेने, प्राथमिक शिक्षणाधिकारी परभणी डाॅ. सुचिता पाटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व तंत्र स्नेही यांच्या सहकार्याने तसेच सुभाष आमले, गटशिक्षणाधिकारी जिंतूर व शिक्षण विस्तार अधिकारी जिंतूर गजाजन वाघमारे, गटसाधन व्यक्ती रत्नमाला तोडकर, केंद्रप्रमुख शिवाजी क-हाळे आदि अतिथींच्या उपस्थितीत फेसबुक लाईव्ह कार्यक्रम आयोजित केला गेला. 

 या दिनाचे औचित्य साधत शाळेतील सहशिक्षक परमेश्वर मेनकुदळे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक करत शाळेसाठी 05 लाख रुपयांचा  लोकसहभाग निधी कसा मिळवला? हे उपस्थितांना पटवून दिले. सहशिक्षका  मीरा दाडगे यांनी लाॕकडाऊन काळामधील आॕन लाईन व आॕफ लाईन शिक्षण कशाप्रकारे विद्यार्थ्यांना दिले हे मार्मिक शब्दांत पटवून दिले.  त्याच बरोबर सहशिक्षका श्रीमती कौशल्या नागरगोजे यांनी शाळेत राबवत असलेले विविध नाविण्यपूर्ण नवोपक्रमाची ओळख करुन दिली तसेच अभ्यासा व्यतीरिक्त कला, क्रिडा व  सांस्कृतिक या मुलभूत घटकातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना कशाप्रकारे या शाळेत वाव दिला जातो असे अनिता भस्मारे यांनी सोप्या भाषेत पटवून सांगीतले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुर्यकांत घुगे, रत्नमाला तोडकर, गटसाधन व्यक्ती जिंतूर, माजी विद्यार्थिनी गीता पोले,बाल चिमुकला इयत्ता पहिलीचा विद्यार्थी अभंग हाके आदिनी शुभेच्छा संदेश देत मनोगत व्यक्त केली.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे केंद्रिय मुख्याध्यापक भास्कर जुमडे, ज्ञानेश्वर हाके, नागेश वाघमारे, संतोष शिंदे, जी.जी.घुगे, श्री.साईबाबा प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.स्वामी, मनोहर कोद्रे,  विजय कांबळे व श्रीकांत आप्पा तडकसे आदिंनी परिश्रम घेतले. सहशिक्षक श्री.भास्कर चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करत उपस्थितांचे मनपूर्वक शाळेच्यावतीने आभार मानले.




Post a Comment

0 Comments