Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

आधीच लग्न लपून दुसऱ्या मुलीशी साखरपुडा करणारा आरोपी अटक




L


ठाणे ➡️ लग्न जुळविणाऱ्या वेबसाईटवर एकमेकांना पसंत केले. लग्नाच्या तीन दिवसाआधी फिर्यादी मुलीला माहिती पडले की, त्याचे लग्न आधीच झाले आहे. दीड वर्षाच्या पाठपुराव्यानंतर जे काम पोलिसांनी करायला हवे होते. ते तिने केले. अखेर तिला फसविणारा तरुण विजय रामचंद्र जगदाळे याला विष्णूनगर पोलिसांनी अटक केली आहे. 

डोंबिवलीत राहणाऱ्या एका तरुणीने लग्न जुळविणाऱ्या एका वेबसाईटवर लग्नाकरीता माहिती टाकली होती. काही दिवसात तिला रिप्लाय आला. नवी मुंबईत राहणाऱ्या विजय जगदाळे याने रिप्लाय दिला. दोघांच्या घराच्यांनी बोलणी केली. त्यानंतर त्यांचा साखरपूडा झाला. 26 मे 2019 रोजी लग्न ठरले. परंतु लग्नाच्या 03 दिवसाआधीच तरुणीला माहित पडले की, तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे आधीच लग्न झालेले आहे. लग्नाची सर्व तयारी झालेली असताना तिच्या कुटुंबियांना मोठा मानसिक धक्का बसला. तरुणीने थेट पोलीस ठाणे गाठले. मात्र, तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र मुणगेकर यांनी तरुणाचे पहिले लग्न झाल्याचे  पुरावा मागितला. तसेच मंदिरातील लग्नाचा पुरावा आमच्यासाठी ग्राह्य नसल्याचं पोलीस निरिक्षक सांगितलं, अशी माहिती पिडीत तरुणीने दिली.

पहिल्या पत्नीसोबत विजयची घटस्फोटाची प्रक्रिया सुरु केली आहे. हा पुरावा घेऊन तरुणीने पोलीस ठाणे गाठले. हा पुरावा देखील पोलिसांनी ग्राह्य धराला नाही. अखेर पिडीत तरुणीने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. एसीपी जे डी मोरे यांच्या आदेशानंतर अखेर या प्रकरणात विष्णूनगर पोलिसांनी तक्रार घेतली. आरोपी विजय जगदाळे आणि त्याच्या वाडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पिडीतेच्या दीड वर्षाच्या पाठपुराव्यानंतर विजय जगदाळे याला अटक करण्यात आली.

या आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला 1 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती विष्णूनगर पोलिस ठाण्याचे तपास अधिकारी वाय. जाधव यांनी दिली. 'आरोपीने मलाच नाही फसवले तर माझ्यासोबत इतर महिलांची देखील फसवणूक केली आहे. त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. जेणेकरुन अन्य कोणत्या मुलीची फसवणूक होता कामा नये', अशी मागणी पिडीतेने केली आहे




Post a Comment

0 Comments