Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

नवले ब्रिजजवळ भीषण अपघात, ब्रेक फेल ट्रेलरची 07 ते 08 वाहनांना धडक





पुणे ➡️ शहरातील अपघातांचा हॉटस्पॉट ठरत असलेल्या नवले पुलाजवळ आज आणखी 01 भीषण अपघात झालाय. आज सायंकाळी सव्वासहा वाजता बंगलोरकडून मुंबईकडे जाणाऱ्या एका 22 चाकी ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन झालेल्या अपघातात अनेक वाहने एकमेकांना धडकली. यामध्ये 02 जण जागीच ठार तर 03 गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना एका खासगी रूग्णालयात दाखल केले आहे.

या विचित्र अपघातामध्ये एकाचवेळी 06 गाड्या एकमेकांना धडकल्या असून 03 गाड्यांचा चुराडा झालाय. अपघाताबाबत माहिती देताना देविदास घेवारे (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सिंहगड पो़.स्टे़) यांनी या अपघातात प्रशांत गोरे (वय 32,रा. उस्मानाबाद) आणि राजेंद्र मुरलीधर गाढवे (वय 65, रा. आंबेगाव खुर्द) असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर 03 जण गंभीर जखमी झाले असल्याचे सांगितले. 

बंगलोरकडून मुंबईकडे 22 चाकी ट्रेलर आर जे 19 जीएफ 4673 जात असताना त्याचे ब्रेक फेल झाले त्याने 01 टेम्पो, 02 दुचाकी, 01 रिक्षा, 04 कार यांना पावणे सहाच्या सुमारास धडक दिली. यात रिक्षा चालक जागिच ठार झाला, तर चार गंभीर जखमी, पाच किरकोळ जखमी झाले. ट्रेलरमध्ये 41 टन मेटल होते. ट्रेलर चालक प्रेमराम रामाराम बिष्णोई ( रा़-जोधपूर, राजस्थान) याला सिंहगड पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक खेडेकर यांनी दिली दिली.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सिंहगड पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. याशिवाय सिंहगड वाहतूक विभाग आणि अग्निशमन दलाच्या काही काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या अपघातामुळे मुंबई बंगळूर महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला काढले असून वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे.




Post a Comment

0 Comments