Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

सिकंदराबाद - मनमाड ही विशेष रेल्वे मंगळवारपासून धावणार





परभणी 
➡️ दक्षिण मध्य रेल्वेने सिकंदराबाद - मनमाड (क्र. 07064/63) ही विशेष रेल्वे मंगळवारपासून (दि.एक) सुरू होणार असल्याची माहिती नांदेड येथील विभागीय कार्यालयाने एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.

सिकंदराबाद - मनमाड (क्र.07064) ही विशेष रेल्वे सिकंदराबाद येथून सायंकाळी 06.50 निघणार आहे. कामारेड्डी येथे रात्री 08.38, निजामाबाद येथ 9.30, बासर येथे रात्री 10.05, धर्माबाद येथे 10.19 मिनिटांनी, उमरी येथे रात्री 11.13, मुदखेड येथे 11.43, नांदेड येथे रात्री 12.20, पूर्णा येथे रात्री 12.58, परभणीत 02.13 पोचणार आहे. पुढे जालना येथे सकाळी 04.20 पोचेल, औरंगाबादेत 5.30 वाजता, लासूर येथे 06.20, रोटेगाव येथे 06.44, नगरसोल येथे 07.10 वाजता तर मनमाड येथे सकाळी 08.05 पोचणार आहे.

मनमाड - सिकंदराबाद (क्र.07063) ही विशेष रेल्वे मनमाड येथून रात्री 08.50 वा निघेल, नगरसोल येथे 09.15, रोटेगावात 09. 39 वा, लासूर 10, औरंगाबादमध्ये 10.40, जालनात 11.45, परभणीत 1.38, पूर्णा येथे 02.18, नांदेडमध्ये सकाळी 3.03, मुदखेडमध्ये सकाळी 03. 53, उमरीत 04.18 धर्माबाद येथे 4.44, बासार येथे 4.54, निजामाबाद येथे 5.28, कामारेड्डी येथे 06.16, वाडीयाराम येथे 07 वाजता, तर सिकंदाराबाद येथे सकाळी 08.50 मिनिटांनी पोचणार असल्याची माहिती रेल्वेच्या सुत्रांनी दिली.




Post a Comment

0 Comments