Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

विनयभंग आणि अश्लिल शिवीगाळ सहन न झाल्याने युवतीने केली आत्महत्या





कोल्हापूर ➡️ गावातील गुंड तरुणांकडून वारंवार होणार विनयभंग आणि अश्लिल शिवीगाळ सहन न झाल्याने महाविद्यालयीन तरुणीने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची  धक्कादायक घटना कोल्हापुर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील नणुंद्रे गावात ही घटना घडली आहे. तिचा शुक्रवारी निधन झाले. त्यामुळे संतप्त जमावाकडून संशयित आरोपींच्या घरावर हल्ला करण्यात आला. यात संशयित आरोपी प्रतीक पाटील, अजित पाटील आणि अक्षय चव्हाण या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

प्राप्त माहितीनुसार अशी की, पन्हाळा तालुक्यातील नणुंद्रे गावात राहणारी  प्राजक्ता सुरेश बाऊचकर (वय-20) असं आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ती पदवीच्या पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी होती. तिच्या वडिलांचे 10 वर्षांपूर्वी सर्पदंशानं निधन झालं होतं. ती गावात आईसोबत राहत होती. अल्पभूधारक असल्यानं दोन्ही मायलेकी किराणा दुकानावर आपला उदरनिर्वाह चालवत होत्या. मात्र, प्राजक्ताची गावातील 03 तरुण गुंड नेहमी छेड काढत होते. एवढेच नाही तर तिच्या मोबाईलवर फोन करून तसेच मेसेज पाठवून तिला त्रास देत होते. अश्या प्रकारे सतत होणारी छेडछाड आणि अश्लिल शिवीगाळ सहन न झाल्यानं प्राजक्तानं 23 ऑक्टोबरला कीटकनाशक  प्राशन केलं होतं. 

पण उपचार सुरू असताना प्राजक्ताचा शुक्रवारी मृत्यू झाला. त्यानंतर नणुंद्रे गावात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. संतप्त जमावानं संशयित आरोपींच्या घरांवर हल्ला केला. घरात घुसून नासधूस केली केली. या घटनेनंतर गावातील वातावरण तणावपूर्ण बनलं आहे. या पार्श्वभूमीवर गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मृत तरुणीच्या आईनं दिलेल्या तक्रारीनुसार तिन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही तक्रार दाखल  झालेल्या नंतर संशयित आरोपी अजित पाटील या तरुणाने घाबरून आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न केल्याची माहिती मिळाली आहे.





Post a Comment

0 Comments