Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

जेम्स बाँडची व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते शॉन कॉनरीचे निधन






मुंबई ➡️ जेम्स बाँडची व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते शॉन कॉनरी यांचं शनिवारी वृद्धापकाळाने निधन झालं आहे. ते 90 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. जेम्स बाँड सिरीजमधील सात चित्रपटांमध्ये शॉन कॉनरी यांनी प्रमुख व्यक्तिरेखा साकारली होती. स्कॉटिश असलेल्या शॉन कॉनरी यांना ऑस्कर, बाफ्टा आणि गोल्डन ग्लोब या मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. शॉन कॉनरी यांच्या निधनानंतर स्कॉटलंडच्या पंतप्रधान निकोला स्टर्गन यांनी शोक व्यक्त केला आहे. जेम्स बाँड साकारणाऱ्या नायकांमध्ये ते सर्वाधिक लोकप्रिय असल्याची बाब नुकतीच एका सर्वेक्षणातून पुढे आली होती.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐





Post a Comment

0 Comments