Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणी व नांदेड जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या परजिल्ह्यात बदल्या; नवीन अधिकारी येणार येणार






परभणी ➡️ नांदेड परिक्षेत्रातील परभणी  व नांदेड जिल्ह्यांतील  पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, निरीक्षक व उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबत विशेष महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी आदेश आज 31 ऑक्टोबरला काढले आहे. 

परभणी जिल्ह्यातून बदली झालेले पोलिस अधिकारी - 

यात परभणी जिल्ह्यातील जिंतूर ठाण्यात कार्यरत पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांची नांदेड येथे बदली, सोनपेठचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांची लातूरला बदली,  परभणी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांची लातूरला, परभणी जिल्ह्यात कार्यरत सपोनि सुनील गिरी यांची हिंगोलीत तर शिवराम जमदाडे, राजू मुत्तेपोड, दुर्गा बारसे यांची नांदेडला बदली करण्यात आली आहे. तर फौजदार शिवाजी बोंडले अनिसा सय्यद, रूपाली कांबळे, भाऊराव आडे, उदय सावंत, रवी मुंडे, गंगाप्रसाद दळवी यांची नांदेडला बदली झाली आहे.  

परभणी जिल्ह्यात येणाऱ्या पोलिस अधिकारी -

नांदेड येथून पोलिस निरीक्षक वसंत चव्हाण निरीक्षक वसंत चव्हाण, चंद्रशेखर चौधरी, प्रदीप काकडे हे तीन अधिकारी जिल्ह्यात रुजू होणार आहेत.  नांदेडचे सहायक पोलिस निरीक्षक सुरेश भाले, लातूरचे संतोष शिरसेवाड, स्वाती कांबळे, मनिषा पवार यांना परभणी जिल्ह्यात नियुक्ती देण्यात आली आहे.


परभणी जिल्हा पोलिस दलातील 75 कर्मचाऱ्यांच्या विनंती बदली  करण्यात आले - 

जिल्हा पोलीस दलात कार्यरत सहायक फौजदार, पोलीस हेड कॉन्स्टेबल, पोलीस नाईक, पोलीस शिपाई या पदांवरील 75 कर्मचाऱ्यांनी केलेल्या विनंतीवरून त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नुतन पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. बुधवार व गुरुवार असे 2 दिवस त्यांनी विनंती बदलीसाठी इच्छुक कर्मचाऱ्यांशी संवाद साधला होता. त्यांच्या कौटुंबिक अडचणी जाणून घेत या बदल्या केल्या आहेत. दरम्यान, बदल्या झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


नांदेड़ परिक्षेत्रातील 10 फौजदारांच्या गडचिरोली परिक्षेत्रात - 

आज गृह विभागाने राज्यातील 150 फौजदारांच्या बदल्या गडचिरोली परिक्षेत्रात केल्या आहेत. त्यामध्ये नांदेड़ परिक्षेत्रातील 10 फ़ौज़दारांचा समावेश आहे.

यात फौजदार श्रीधर वाघमारे, शिवजी बोंडले, पंढरी लक्ष्मण गंधकवाड, राजाभाऊ बाबूराव घाडगे, चंद्रशेखर राजकुमार मोरखंडे, श्रीकिशन कांडे ( कानडे), बालाजी लोसरवार, नारायण शिंदे, बालाजी चव्हाण व स्मिता जाधव यांचा समावेश आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापन) राजेश प्रधान यांनी हे आदेश काढले आहेत.




Post a Comment

0 Comments