Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणी, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, पुणे जिल्ह्यातील शुक्रवारचा कोरोना रिपोर्ट





19 कोरोनामुक्त व्यक्तींना डिस्चार्ज व 14 कोरोनाबाधित भर

परभणी ➡️  जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 30) 14 व्यक्ती कोरोनाबाधित आढळले. 19 कोरोनामुक्त व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून प्रेसनोटद्वारे देण्यात आली. कक्षात भरती रुग्ण 193 आहेत. आजपर्यंत 264 कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 6 हजार 525 कोरोनाबाधित व्यक्ती आढळले असून 6 हजार 068 कोरोनामुक्त व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

करोनामुळे 04 मृत्यू, 197 नवीन बाधितांची भर

चंद्रपूर ➡️ जिल्ह्यात मागील 24 तासात करोनामुळे 04 मृत्यू झाले असून 197 नवीन बाधितांची भर पडली आहे. आतापर्यंत बाधितांची एकूण संख्या  15 हजार 635 वर पोहोचली आहे. दरम्यान 175 बाधित करोनातून बरे झाल्याने सुरूवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 12 हजार 522 झाली आहे. जिल्ह्यात सध्या 02 हजार 882 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 01 लाख 19 हजार 520 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 01 लाख 02 हजार 332 नमुने निगेटीव्ह आले आहेत. आज मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली येथील 55 वर्षीय महिला व आरमोरी येथील 45 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर सिंदेवाही तालुक्यातील नांदगाव येथील 77 वर्षीय महिला, मुल येथील 80 वर्षीय महिलेचा समावेश आहे. 

47 जण नव्याने पॉझेटिव्ह 

यवतमाळ ➡️ जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज दि.30/10/2020 रोजी एकूण 399 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 47 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 352 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 358 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यात होम आयसोलेशन मधील 98 पॉझेटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 10, 135 झाली आहे.

43 कोरोना बाधितांची भर तर तिघांचा मृत्यू      

नांदेड ➡️ शुक्रवार 30 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 105 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 43 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 18 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 25 बाधित आले. आजच्या एकुण 1 हजार 299 अहवालापैकी  1 हजार 226 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 19 हजार 70 एवढी झाली असून यातील  17  हजार 822 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 600 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 41 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

या अहवालात 03 बाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. यात शुक्रवार 30 ऑक्टोंबर 2020 रोजी बाफना रोड नांदेड येथील 61 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात, वजिराबाद नांदेड येथील 59 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे, तर बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी येथील 38 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 507 एवढीच आहे.   

नव्याने 284 रुग्ण आढळले, 16 रुग्णांचा मृत्यू 

पुणे ➡️ शहरात शुक्रवारी दिवसभरात नव्याने 284 रुग्ण आढळल्याने शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या आता 01 लाख 60 हजार 961 एवढी झाली आहे. आज दिवसभरात 16 रुग्णांचा करोनानी लढताना मृत्यू झाला आहे. आतापर्यंत करोनाशी लढताना 04 हजार 211 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या 322 रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे दिवसा अखेर 01 लाख 51 हजार 145 रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात 173 करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून 04 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 121 जणं करोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 87 हजार 594 वर पोहचली आहे. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या 947 एवढी असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.




Post a Comment

0 Comments