Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

नागपूरच्या वसुली संस्थेला कर्मचारीने लावला 19 लाखांचा लावला चुना





जिंतूर ➡️  तालुक्यातील कोरवाडी येथील राहणाऱ्या व्यक्तीने नागपुर येथील कॅप्टन कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या संंस्थाला 18 लाख 51 हजार 901 रुपयांचा चुना लावला. या संबंधीत 29 ऑक्टोबर रोजी आरोपीच्या विरूध्द जिंतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 

 पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर येथील रहिवासी अरुण भजनी हे कॅप्टनस कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या संस्थाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. कंपनी सध्या सिक्स बँकेच्या विविध पॅनेलवर आर्थिक सल्लागार म्हणून कार्यरत आहे. ही संस्था बँकेच्या थकित कर्जधारकांच्या वतीने कर्ज वसूली करते. याअंतर्गत फिर्यादी अरुण भजनी (64) यांनी परभणी जिल्ह्यातील वसूली कामांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एका कर्मचार्‍याची आवश्यकता होती. यामुळे संस्थापक अध्यक्ष अरुण भजनी यांनी आपल्या आपल्या संस्थामध्ये कार्यरत कर्मचारी विजय राठोड यांच्या मदतीने कोरवाडी येथील आरोपी भास्कर चव्हाण यांना नोकरी दिली.

अगोदर आरोपी भास्कर चव्हाणने सुरुवातीला प्रामाणिकपणे आपले काम करीत होते. यामुळे अरुण भजनी यांनी भास्कर चव्हाण यांच्यावर विश्वास ठेवला. भजनी यांनी त्यांचे बिल पुस्तक आणि इतर महत्त्वपूर्ण कागदपत्र त्यांच्याकडे दिले. भास्कर चव्हाण भजनीच्या आदेश व नियमांनुसार आपले काम करीत होते. परंतु जून 2018 महिन्यापासून आरोपी भास्कर  यांनी बँक खात्यात वसूलीचे कोणतेही बिल जमा केले नाही. त्यामुळे भास्कराच्या कामावर संशय निर्माण झाले. 

यानंतर अरुणने स्वतः ताडकलस, सोनपेठ, जिंतूर, नानलपेठ, परभणी, पूर्णा, हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव, गोरेगाव या ठिकाणी असलेले भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत चौकशी केली असता, आरोपी  भास्कर चव्हाणने 17 जून 2018 ते 16 ऑगस्ट 2019 पर्यंत बनावट बिल पुस्तक आणि कागदपत्रे तयार करून आपल्या खात्यात वसुलचे पैसे जमा केले. या माहितीवरुन अरुण भजनी यांच्या फिर्यादीवरून आरोपी भास्कर चव्हाण यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम 420, 406, 408, 465, 467, 468, 471, 474 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




Post a Comment

0 Comments