Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी लांबविला सव्वालाख किंमतीचा मुद्देमाल





परभणी
➡️ जिंतूर रस्त्यावरील दत्तनगरमधील एका घराचे कुलूप तोडत चोरट्यांनी सव्वालाख रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला. नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार दत्तनगर भागात राहणाऱ्या बालाजी देशमुख हे  लॉकडाऊन असल्याने कुटूंबासह ते झरी या मुळगावी गेले होते. गुरुवारी (दि.29) ते दत्तनगरातील घरी आले. त्यावेळी त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. त्यावेळी त्यांनी घरात जाऊन पाहिले असता घरात ठेवलेले सोन्याच्या वस्तूसह 20 हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी चोरी केली. त्यांनी तातडीने नानलपेठ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्यावेळी 22 ऑक्टोबर रोजी 02 अज्ञात व्यक्ती घरात गेल्याचे त्यात दिसून आले. चोरटे सीसीटीव्हीत दिसत असल्याचे पोलिस सुत्रांनी म्हटले आहे.  नानलपेठ पोलिस ठाण्यात श्री. देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीवरून सव्वा लाखाच्या जवळपास ऐवज चोरीस गेल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. चोरट्यांनी कपाटात ठेवलेले रोख 20 हजार रुपयांसह 02 अंगठ्या, कानातील सोन्याचे 02 जोड,  गोल्ड मेडल असे एकूण सव्वालाख रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केले.





Post a Comment

0 Comments