Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणी, नांदेड, औरंगाबाद, नागपूर जिल्ह्यातील बुधवारचा कोरोना रिपोर्ट






जिल्ह्यात 41 जण कोरोनाबाधित, एका बाधिताचा मृत्यू

परभणी ➡️  जिल्ह्यात बुधवारी (दि. 28) 41 व्यक्ती कोरोनाबाधित आढळले. तर 12 कोरोनामुक्त व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला. एका कोरोनाबाधित पुरूषाचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून प्रेसनोटद्वारे देण्यात आली. कक्षात भरती रुग्ण 207 आहेत. आजपर्यंत 263 कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 6 हजार 486 कोरोनाबाधित व्यक्ती आढळले असून 6 हजार 16 कोरोनामुक्त व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


118 बाधितांना सुट्टी94 कोरोना बाधितांची भर      

नांदेड ➡️ बुधवार 28 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 118 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 94 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 39 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 55 बाधित आले. आजच्या एकुण 1 हजार 722 अहवालापैकी  1 हजार 583 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 18 हजार 956 एवढी झाली असून यातील 17  हजार 616 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 707 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 36 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. या अहवालात एकाही बाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 504 एवढीच आहे.   

 दिवसभरात 119 कोरोना रुग्णांची भर 

औरंगाबाद ➡️ जिल्ह्यात बुधवारी (ता.28 ) दिवसभरात 119 कोरोना रुग्णांची भर पडली, तर 265 जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत  35 हजार  893 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. एकूण बाधितांची रुग्णांची संख्या 37 हजार 783 आहे. आतापर्यंत एकूण 1 हजार 66 जणांचा मृत्यू झाल्याने सध्या 824 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मोबाईल स्वॅब संकलन पथकास 38 आणि ग्रामीण भागात 16 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

342 नवीन रुग्ण आढळून आले, तर 12 जणांचा मृत्यू 

नागपूर ➡️  नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग हळूहळू कमी होत आहे. बुधवारी कोरोनाचे 342 नवीन रुग्ण आढळून आले, तर 12 जणांचा मृत्यू झाला तसेच 458 जण बरे झाले. बरे झालेल्या रुग्णांची संख्या नवीन रुग्णांपेक्षा जास्त असल्याने बरे होण्याचे प्रमाण 91.73 टक्क्यावर पोहोचले आहे. आतापर्यंत एकूण 86, 751 जण बरे झालेले आहेत. आज आढळलेल्या नवीन रुग्णांमध्ये शहरातील 213, ग्रामीणमधील 126 आणि जिल्ह्याबाहेरचे 03 आहेत. यासोबतच एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 94, 575 वर पोहचली आहे. आज झालेल्या मृत्यूमध्ये शहरातील 06, ग्रामीणमधील 03 आणि जिल्ह्याबाहेरचे 03 आहेत. आतापर्यंत एकूण 03, 097 मृत्यू झाले आहेत. 





Post a Comment

0 Comments