Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

जादूटोणा करतो म्हणून दिव्यांग व्यक्तीचा खून





औरंगाबाद ➡️ तू माझ्यावर जादूटोणा व करणी केली असे म्हणत एका 48 वर्षीय दिव्यांग व्यक्तीस त्याच्याच कुबडीच्या साहाय्याने व दगडाने ठेचून जबरी मारहाणी केली. यात दिव्यांग व्यक्तीचा मृत्यू झाला. जालना महामार्गावर हिवरा फाट्याजवळील दर्गा परिसरात बुधवारी (ता.28) सकाळी 8.30 च्या सुमारास ही घटना घडली आहे. 

 प्राप्त माहितीनुसार जालना महामार्गालगत हिवरा फाट्याच्या जवळील हॉटेल रामजीसमोर सैलानी बाबांचा दर्गा आहे. बुधवारी सकाळी आरोपी भाऊसाहेब सदू शेजवळ (वय 45, रा. कुंभेफळ ता.जि.औरंगाबाद)  दर्ग्यावर दर्शन घेऊन थांबला असताना  ज्ञानेश्वर आसाराम गडकर ( वय 48, रा. सावित्रीनगर, चिकलठाणा) हे ही तेथे दर्शनासाठी आले होते. यावेळी शेजवळ याने गडकरांना तू माझ्यावर जादूटोणा व करणी केल्याचे सांगून वाद घातला. दोघांत वाद सुरू असतानाच शेजवळ याने श्री.गडकर यांचीच कुबडी हिसकावून घेत तिनेच त्यांना मारहाण केली. कुबडी तुटल्यानंतर दगडाने ठेचले. यात ज्ञानेश्‍वर गडकर रक्तबंबाळ होऊन जागेवरच कोसळले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. तत्परतेने जखमीला औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या पश्चात पत्नी, आई, एक मुलगा व दोन मुली आहे. शवविच्छेदनानंतर बुधवारी दुपारी साडेचार वाजता मृतदेह करमाड पोलिसांनी नातेवाईकांकडे सुपुर्द केल्यानंतर चिकलठाणा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. रात्री श्री.गडकर यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून करमाड पोलिस ठाण्यात आरोपी भाऊसाहेब शेजवळ याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 




Post a Comment

0 Comments