Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

एक पोलिस कर्मचारी सेवेतून बडतर्फ, तर दोघांची वेतनवाढ रोखली





परभणी
➡️ शासकीय सेवेत असताना टिप्पर विकत घेऊन त्याचा अवैधरित्या वाळू वाहतुकीसाठी वापर करणार्‍या पोलिस कर्मचार्‍यास  शासकीय सेवेतून बडतर्फ केले आणि दुसर्‍या प्रकरणातील अऩ्य दोघा पोलिस कर्मचार्‍यांची वार्षिक वेतनवाढ 03 वर्षांसाठी स्थगित करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी बुधवारी (दि.28) दिले.

यातील निलंबित पोलिस शिपाई सुग्रीव धोंडीबा कांदे (नेमणूक सोनपेठ पोलिस ठाणे) यांनी पोलिस अधीक्षकांची पूर्व परवानगी न घेता हायवा टिप्पर वाहन (क्र.एमएच-04 -एफडी- 9039) हे खरेदी करून शासकीय नोकरीत असतानाही शासनाने बंदी घातलेल्या गौण खनिज वाहतुकीसाठी अवैधरित्या वाळू वाहतुकीसाठी त्याचा वापर केल्याचे यापुर्वीच स्पष्ट झाले होते. त्यामुळे त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते. या संदर्भात विभागीय चौकशी करण्यात आली. त्या चौकशीचा अहवाल पोलिस अधीक्षक जयंत मीना यांना प्राप्त झाला. बुधवारी (दि.28) पोलिस शिपाई सुग्रीव कांदे यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.

तर पोलिस नाईक भीमराव हरी पवार व निलंबित चालक पोलिस शिपाई भगीरथ रघुनाथ जाधव (दोघांची नेमणूक पाथरी पोलिस ठाणे) यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी तिप्पलवाड यांनी अवैध वाळू वाहतुक करणारा ट्रक पकडून पोलिस ठाण्यात कसे काय आणले, याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. तिप्पलवाड यांच्याशी एकेरी भाषा वापरून वाद केला. या संदर्भात विभागीय चौकशी करण्यात आली. त्या चौकशीचा अहवाल पोलिस अधीक्षक मीना यांना प्राप्त झाला. श्री. मीना यांनी या दोन्ही पोलिस कर्मचार्‍यांच्या आगामी वार्षीक वेतनवाढ कायमस्वरूपी तीन वर्षांसाठी स्थगित करण्याबाबत बुधवारी आदेश जारी केले.




Post a Comment

0 Comments