Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

200 रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या बापलेकांना अटक





धुळे
➡️ 
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील कळमसरे गावात बनावट नोटांचा कारखाना पोलिसांनी उद्घवस्त केला आहे. पोलिसांनी छापा टाकून 200 रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या बापलेकाच्या मुसक्या आवळल्या आहेत.

धुळे स्थानिक गुन्हे शाखेने बनावट नोटांचा कारखाना उघडकीस आणला आहे. पोलिसांनी कळमसरे गावातील संतोष गुलाब बेलदार याच्या घरात यावेळी 200 रुपये दराच्या भारतीय चलनी नोटांच्या हुबेहूब रंग आकारातील बनावट नोटा तयार करण्यात येत असल्याचे आढळून आले. या ठिकाणाहून पोलिसांना तयार केलेल्या  नकली नोटा तसेच छपाई करीत असलेल्या नोटा मिळून आल्या. पोलिसांच्या छापा पडताच घरातील नकली नोटा बेसिन मध्ये आरोपी संतोष बेलदारचे वडील बेसिनमध्ये बनावट नोटा जाळत असताना आढळून आले. घटनास्थळावरुन पोलिसांनी दोन कॉम्पुटर, एच.पी. कंपनीचे कलर प्रिंटर, 02 मोबाईल फोन, कटर, मोजमाप पट्ट्या, कोरे पेपर आदी साहित्य असा एकुण 48 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच या संबंधीत बनावट नोटा प्रकरणी चौघांच्या  विरोधात शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संतोष बेलदारसह दोघांना अटक केली आहे.

आरोपींनी धुळे जिल्ह्यासह आणखी कुठे कुठे बनावट नोटा चलनात आणल्या आहेत. याचाही शिरपूर पोलीस तपास करत आहे. बनावट नोटांचं मोठं रॅकेट बाहेर येण्याचा संशय पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी पोलिसांनी वर्तवला आहे. बनावट दारू, गांजा, अंमली पदार्थांच्या तस्करीनंतर आता थेट बनावट नोटांचा मिनी कारखाना उघडकीस आल्याने शिरपूर तालुका पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.




Post a Comment

0 Comments