Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

अंबरनाथ शहर उपाध्यक्ष राकेश पाटील यांची भररस्त्यात धारधार शस्त्रांनी हत्या





ठाणे
 ➡️ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अंबरनाथ शहर उपाध्यक्ष राकेश पाटील यांची भररस्त्यात धारधार शस्त्रांनी हत्या केल्याची घटना आज सायंकाळी घडली. जखमी अवस्थेत पाटील यांना कल्याणच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. हत्येमागचे कारण स्पष्ट झाले नसून, शिवाजी नगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी सायंकाळी 6 च्या सुमारास राकेश पाटील हे अंबरनाथ-पाले गावातील संकुलाजवळ कामानिमित्त गेले होते.यावेळी चार अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला चढविला. पाटील यांनी त्यांचा प्रतिकार देखील करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चौघांच्या हल्ल्यात पाटील गंभीर जखमी झाले.

त्यांना त्वरित कल्याणच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांना डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. या हत्येचा मनसेने तीव्र शब्दात निषेध केला आहे. ही हत्या राजकीय वैमनस्यातून घडली आहे की इतर काही कारणातून, याचा पोलिस शोध घेत होते. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली होती. 

अवघ्या दोन तासात चारही आरोपी अटकेत असून इतर आरोपींचा देखील पोलीस शोध घेत आहेत. हे चारही आरोपी राकेश पाटील यांची हत्या करून मुरबाडच्या दिशेने पळून जात होते, त्याच दरम्यान वायरलेस वरून मिळालेल्या माहितीनुसार मुरबाड पोलिसांनी मुख्य हायवेवर नाकाबंदी लावली होतीनाकाबंदी लावलेली असताना संशयास्पद स्कॉर्पिओ कार जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी ती गाडी अडवित त्यांच्याकडे चौकशी केली.

गाडीची झडती घेतली असता हत्येसाठी वापरण्यात आलेली शस्त्रे त्या गाडीत सापडले आहेत. राकेश पाटील यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या शस्त्र मध्ये चॉपर आणि एका रॉडचा समावेश आहे. मुरबाड पोलिसांनी या चारही आरोपींना अटक करून अंबरनाथ पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. दरम्यान या हत्येप्रकरणात अंबरनाथ मधील एका बडा बांधकाम व्यावसायिकाच्या सहकार्याचे नाव देखील येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.




Post a Comment

0 Comments