Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणी, पुणे, नांदेड, ठाणे, बीड, चंद्रपूर, औरंगाबाद, हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यातील गुरुवारचा कोरोनो रिपोर्ट






33 कोरोनामुक्त व्यक्तींना डिस्चार्ज व 25 कोरोनाबाधित भर

परभणी ➡️  जिल्ह्यात गुरुवारी (दि. 29) 25 व्यक्ती कोरोनाबाधित आढळले. 33 कोरोनामुक्त व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून प्रेसनोटद्वारे देण्यात आली. कक्षात भरती रुग्ण 199 आहेत. आजपर्यंत 263 कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 6 हजार 511 कोरोनाबाधित व्यक्ती आढळले असून 6 हजार 49 कोरोनामुक्त व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

.

101 बाधितांना सुट्टी71 कोरोना बाधितांची भर      

नांदेड ➡️ गुरुवार 29 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 101 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 71 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 27 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 44 बाधित आले. आजच्या एकुण 1 हजार 591 अहवालापैकी  1 हजार 505 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 19 हजार 27 एवढी झाली असून यातील 17 हजार 717 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 669 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 36 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. या अहवालात एकाही बाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 504 एवढीच आहे.  

 

303 रुग्ण आढळले, 15 रुग्णांचा मृत्यू 

पुणे ➡️ शहरात आज दिवसभरात नव्याने 303 रुग्ण आढळल्याने 01 लाख 60 हजार 677 एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर 04 हजार 195 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या 463 रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर 01 लाख 50 हजार 823 रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात 182 करोना बाधित रुग्ण आढळले असून 03 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 315 जण करोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या 87 हजार 433 वर पोहचली असून पैकी 84 हजार 125 जण करोनातून बरे झाले आहेत.


आज 953 नवे कोरोनारुग्णांची भर,  25 जणांचा मृत्यू

ठाणे ➡️ जिल्ह्यात केवळ 953 नवे रुग्ण गुरुवारी सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत 02 लाख 10 हजार 96 रुग्णांची नोंद झाली आहे. तर, आज 25 मृत्यू झाल्यामुळे आता जिल्ह्यातील मृतांची संख्या 05 हजार 301 झाली आहे. ठाणे शहरात 336 रुग्ण आज आढळून आले आहेत. आता या शहरात 47 हजार 285 बाधीत रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, 04 जणांचा मृत्यू झाल्यामुळे 01 हजार 145 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर कल्याण - डोंबिवली परिसरात 159 रुग्णांची वाढ झाली असून 01 मृत्यू झाला आहे. या शहरात आतापर्यंत 49 हजार 777 बाधीत झाले. तर, 01 हजार मृतांची नोंद करण्यात आली आहे. 

70 संशयित पॉझिटिव्ह रुग्णांची भर

बीड ➡️ गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णात कमी-जास्त प्रमाणात वाढ होत आहे. आज आरोग्य विभागाला 753 संशयितांचे अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये सर्वाधिक पॉझिटिव्ह बीड, अंबाजोगाई त्यापाठोपाठ वडवणीत आढळले असून जिल्ह्यात एकूण 70 संशयित पॉझिटिव्ह आढळले आहेत. जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा वाढला असून त्या तुलनेत बरे होणार्‍या रुग्णांची संख्या वाढत आहे. आज आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये अंबाजोगाई 10, आष्टी 07, बीड 20, धारूर 01, गेवराई 07, केज 02, माजलगाव 07, परळी 03, पाटोदा 01, शिरूर 02 तर वडवणी तालुक्यात 10 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत असली तरी मृत्यूदर झपाट्याने वाढत आहे. राज्याचा मृत्यूदर 2.63 टक्के असून बीड जिल्ह्याचा सर्वाधिक 3.13 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 01 लाख 18 हजार कोरोना चाचण्या झाल्या असून 13 हजाराच्या वर रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.


161 जण नव्याने पॉझिटिव्ह रुग्णांची भर

चंद्रपूर ➡️ जिल्ह्यात मागील 24 तासात एकही बाधिताचा मृत्यू झालेला नसून  148 जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. दरम्यान 161 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत. नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 161 बाधितांसोबत आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 15 हजार 438 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात 148 बाधित करोनातून बरे झाल्याने सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 12 हजार 347 झाली आहे. सध्या 02 हजार 864 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 01 लाख 18 हजार 630 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 01लाख 01 हजार 603 नमुने निगेटीव्ह आले आहे.


 133 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर 

औरंगाबाद ➡️ औरंगाबाद जिल्ह्यात आज गुरुवारी (ता. 29) 133 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 37 हजार 916 झाली. आजपर्यंत एकूण 01 हजार 69 जणांचा मृत्यू झाला. सध्या एकूण 618 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अँटीजेन टेस्टमध्ये महापालिका पथकाला 21 व ग्रामीण भागात 29 रुग्ण आढळले. आज 336 जणांना सुटी झाली. यात शहरातील 256 व ग्रामीण भागातील 80 जणांचा समावेश आहे. आजपर्यंत 36 हजार 229 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.


09  रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह

हिंगोली ➡️ जिल्ह्यात 09 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 02 व्यक्ती, सेनगांव परिसरात 01 व्यक्ती, कळमनुरी परिसर 02 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे सेनगांव परिसर 01 व्यक्ती, हिंगोली परिसर 03 व्यक्ती असे एकूण 09 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 06 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 14 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे.


 55 जण नव्याने पॉझेटिव्ह,  02 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु

यवतमाळ ➡️ वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर व कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 71 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात गत 24 तासात 55 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला. मृतकांमध्ये यवतमाळ शहरातील 70 वर्षीय महिला आणि नेर तालुक्यातील माणिकवाडा धनज येथील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि.29) रोजी एकूण 380 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 55 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 325 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले.





Post a Comment

0 Comments