Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

नांदेड व परभणी,यवतमाळ, बीड जिल्ह्यातील कोरोना रिपोर्ट




216 बाधितांची भर तर चार जणांचा मृत्यू 


नांदेड ➡️ मंगळवार 29 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 225 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 216 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 68 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 148 बाधित आले. आजच्या एकुण 986 अहवालापैकी 740 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 15 हजार 442 एवढी झाली असून यातील 11 हजार 715 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 3 हजार 242 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 32 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. या अहवालात एकुण 04 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
 
जिल्ह्यात आज 82 कोरोना रुग्णांंची भर; 2  मृत्यू

परभणी ➡️ शहरासह जिल्ह्यात आज दि.29 सप्टेंबर रोजी दिवसभरात 82 कोरोनाबाधित आढळले. दरम्यान, आज पर्ज्ञीी बाधिताचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोना बळींची एकूण संख्या आता 224 झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 5 हजार 316 रुग्ण कोरोनाबाधित आढळले असून 4 हजार 501 रुग्ण आजारातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. तसेच 224 बाधित मृत्यूमुखी पडले असून रुग्णालयातील संक्रमित कक्षात 591 रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत एकूण 42 हजार 649 संशयितांचे स्वॅब घेतल्या गेले असून त्यातील 37 हजार 24 स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. तर 5 हजार 190 स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. 319 स्वॅब अनिर्णायक असून 76 स्वॅब तपासणीस अयोग्य ठरले आहेत. तर 40 प्रलंबित राहिले आहेत.

परभणी शहरात 90 जणांची कोरोना चाचणी;  2 आढळले बाधित 
परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने मंगळवारी रोजी शहरातील 7 केंद्र, 7 खासगी रुग्णालयात 90 व्यक्तींची रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्टद्वारे तपासणी करण्यात आली. यात 88 निगेटीव्ह तर 2 व्यक्ती बाधित आढळल्या. खानापूर आरोग्य केंद्रात 8 व्यक्तींची तपासणी केली असता 2 जण बाधित आढळले. सीटी क्लब येथे 38,शंकर नगर येथील आरोग्य केंद्रात 3, जायकवाडी मनपा रुग्णालयात 7, खंडोबा बाजार आरोग्य केंद्रात 4, इनायत नगर आरोग्य केंद्रात 2, साखला प्लॉट आरोग्य केंद्रात 4 जणांची तपासणी करण्यात आली. तसेच 7 खासगी रुग्णालयात 24 जणांची तपासणी केली असल्याची माहिती नोडल अधिकारी अभिजीत कुलकर्णी यांनी दिली.

08 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु, 194 जण नव्याने पॉझेटिव्ह

यवतमाळ ➡️ गत 24 तासात जिल्ह्यात आठ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 194 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. मृत झालेल्या आठ जणांमध्ये यवतमाळ शहरातील 70 वर्षीय पुरुष व 58 वर्षीय महिला, वणी शहरातील 70 वर्षीय महिला, पुसद येथील 64 वर्षीय पुरुष, महागाव शहरातील 30 वर्षीय पुरुष, बाभुळगाव शहरातील 65 वर्षीय पुरुष, राळेगाव शहरातील 63 वर्षीय पुरुष आणि आर्णि तालुक्यातील 70 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे तर नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 194 जणांमध्ये 127 पुरुष व 67 महिला आहेत.
 यात यवतमाळ शहरातील 49 पुरुष व 21 महिला, यवतमाळ तालुक्यातील 03 पुरूष व 02 महिला,  पांढरकवडा शहरातील 28 पुरुष व 15 महिला, पांढरकवडा तालुक्यातील 02 पुरुष, पुसद शहरातील 18 पुरुष व नऊ महिला, आर्णी शहरातील 07 पुरुष व 02 महिला, आर्णी तालुक्यातील 01 महिला, दारव्हा  शहरातील एक पुरुष, दिग्रस शहरातील 02 पुरुष व पाच महिला, महागाव शहरातील 03 पुरुष व 02 महिला, महागाव तालुक्यातील तीन पुरुष व चार महिला, मारेगाव शहरातील दोन पुरुष, नेर शहरातील 03 पुरुष, उमरखेड शहरातील एक पुरुष व एक महिला, वणी शहरातील चार पुरुष व पाच महिला, वणी तालुक्यातील एका पुरुषाचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात कोरोनाचे 146 रुग्ण

बीड ➡️  गेल्या 24 तासात बीड जिल्ह्यात कोरोनाचे 146 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 9704 वर पोहचली आहे. मंगळवारी दुपारी 892 जणांचा अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये 146 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. तर 746 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. 146 जणांमध्ये अंबाजोगाई तालुक्यातील 27 जण, आष्टी तालुक्यातील 21 जण, बीड तालुक्यातील 38 जण, धारूर 8, गेवराई 6, केज 19, माजलगाव 6, परळी 7, पाटोदा 5, शिरूर 6 आणि वडवणी तालुक्यातील 3 जणांचा समावेश आहे. बीड जिल्ह्यात आतापर्यंत 6778 जण कोरोनामुक्त झाले आहेत तर 2767 जणांवर उपचार सुरू आहेत. बीड जिल्ह्यातील ग्रामिण भागामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.


 





Post a Comment

0 Comments