Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02




पुणे - आज भल्या पहाटे उठून पत्नीने झोपेत असलेल्या पतीच्या गळ्यावर फावड्याचा घाव घालत निर्घृण खून केला. संशयावरून ताब्यात घेतलेल्या पत्नीने खुनाची कबुली दिल्यानंतर या घटनेला वाचा फुटली. देहूरोड परिसरातील मामुर्डी गावात मंगळवारी (दि. 29) पहाटे ही धक्‍कादायक घटना घडली. या प्रकरणी पत्नीवर देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौटुंबिक कलहातून घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. मयूर गोविंद गायकवाड (वय 28, रा. मामुर्डी, देहूरोड) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी मयूरच्या पत्नी रितू (वय 24) हिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Post a Comment

0 Comments