Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

बाबरी मशिद उद्‌ध्वस्त प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता





लखनऊ
➡️ 06 डिसेंबर 1992 रोजी आयोध्येतील वादग्रस्त बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी लखनऊतील विशेष सीबीआय न्यायालयाने या खटल्यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. वादग्रस्त बाबरी मशीद पाडण्याचा कट पूर्वनियोजित नव्हता, असेही विशेष सीबीआय न्यायमूर्ती एस. के. यादव यांनी आज दिलेल्या निकालात म्हटले आहे.

या खटल्यात लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, कल्याण सिंह, विनय कटियार, साक्षी महाराज, लल्लू सिंग, बीबी शरण सिंग या आठ भाजप नेत्यांसह 49 आरोपी होते. त्यातील 17 आरोपींचा मृत्यू झाला आहे. न्यायालयाने आज उर्वरित 32 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्यात सीबीआयने 351 साक्षीदार आणि सुमारे 600 कागदपत्रे न्यायालयात सादर केली होती. प्राचीन राम जन्मभूमीच्या जागेवरच ही मशीद बांधण्यात आल्याचा दावा करत 06 डिसेंबर 1992 रोजी कारसेवकांनी आयोध्यातील ही मशीद पाडली होती. सीबीआयने 1993 मध्ये आरोपपत्र दाखल केले होते.



Post a Comment

0 Comments