Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

राष्ट्रवादीच्या पैठणचे तालुकाध्यक्षाची आत्महत्या




औरंगाबाद ➡️ राष्ट्रवादी काँग्रेसचे पैठणचे तालुकाध्यक्ष काकासाहेब कणसे यांनी औरंगाबादेतील घाटी रूग्णालयातील सुपर स्पेशालिटी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली, कणसे 42 वर्षाचे होते. हि घटना आज रविवारी दि. 27 रोजी सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास घडली. काकासाहेब कणसे कोरोना पॉझिटिव्ह होते.

घाटी प्रशासनाने दिलेली माहिती अशी की, काकासाहेब श्रीधर सकाळी 21 सप्टेंबरला कोरोनाची लागण झाली होती. यानंतर सकाळी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने 24 सप्टेंबरला दुपारी 04 वाजेच्या दरम्यान अतिदक्षता विभागाच्या वॉर्ड क्रमांक 34 मध्ये शिफ्ट करण्यात आले होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. रविवारी सकाळी त्यांनी शौचालयाला जायचे असल्याचे चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांना सांगितले होते. व्हेंटिलेटरवर असलेल्या रूग्णाला शौचालयात नेण्यात परवानगी नसल्याने, त्यांना पॉट देण्यात आले. त्यानंतर कर्मचारी बाहेर थांबले होते. काकासाहेब कणसे यांनी कोणालाही न सांगता, त्याच्या बेडजवळ असलेल्या खिडकीतून खाली उडी मारली, अशी माहिती सुपर स्पेशालिटी ब्लॉकचे विशेष कार्य अधिकारी डॉ. सुधीर जाधव यांनी दिली. 

या घटनेची नोंद बेगमपूरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. काकासाहेब कणसे यांच्या आत्महत्येची माहिती मिऴताच पैठणचे माजी आमदार संजय वाघचौरे हे घाटीच्या सुपर स्पेशालिटी ब्लॉकमध्ये पोहोचले. त्यांनी घटनेबाबत डॉक्टरांशी चर्चा केली. 24 सप्टेंबरला काकासाहेब कणसे यांना व्हेंटिलेटर मिळावे, यासाठी प्रयत्न करण्यात आला होता. काकासाहेबांनी आत्महत्या का केली? याची चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे करण्यात आली, असे त्यांनी सांगितले.





Post a Comment

0 Comments