Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

15 नेत्यांना वीजबिलच नाहीत, सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र कात्री






मुंबई ➡️ कोरोनामुळे जाहिर झालेल्या लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य लोकांना हजारो रुपयांचे वीजबिल मिळाले. त्यांची वीजबिल भरता-भरता दमछाक झाली. परंतु राज्यातील काही मंत्री यातून बचावले. कारण 15 मंत्र्यांना चक्क वीजबिलच दिले गेले नाही, अशी बाब माहिती अधिकारातून समोर आली.

मागील 05 महिन्यात तुटपुंज्या खर्चात घर चालवत असताना हजारो रुपयांचे लाईटबिल घरात येऊन पडल्यानंतर सर्वसामान्यांना धसका बसत होता. लॉकडाऊनमुळे नोक-या गेल्याने घर खर्चाला पैसे नाही त्यात असे भलेमोठे वीजबिल पाहून सर्वसामान्यांना संकट पडत होते. अनेक सेलिब्रिटी याविषयी सोशल मीडियावर आपले म्हणणे मांडत होते. परंतु लाईटबिलचा सर्वात जास्त फटका हा सर्वसामान्य कुटुंबांनाच बसला आहे.

याबाबत आरटीआय कार्यकर्ता अनिल गलगली यांनी माहिती मागवली. त्यांनी लोकनिर्माण विभागाकडून मार्च, एप्रिल, मे, जून आणि जुलैमध्ये राज्यातील मंत्र्यांच्या बंगल्याच्या वीजबिलाबाबत माहिती विचारली. लोकनिर्माण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 15 मे पासून 5 मंत्र्यांना मागील 5 महिन्यांपासून विजेचे बिल पाठवले नाहीत. त्यात केसी पाडवी, अमित देशमुख, दादाजी भुसे, संजय राठोड, हसन मुश्रीफ यांची नावे समाली आहेत. तसेच गेल्या 4 महिन्यांपासून आदित्य ठाकरे, धनंजय मुंडे, उदय सामंत, गुलाबराव पाटील, अनिल परब, जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, बाळासाहेब पाटील, संदीपान भुमरे यांनाही वीजबिले पाठवण्यात आलेली नाहीत. 





Post a Comment

0 Comments