Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

नांदेड जिल्ह्यात 275 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी, 182 बाधितांची भर तर 04 जणांचा मृत्यू




नांदेड ➡️  रविवार 27 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 275 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 182 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 76 तर अँटिजेन किट्स तपासणीद्वारे 106 बाधित आले.

04 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू
शनिवार 26 सप्टेंबर रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी परिसरातील 60 वर्षाच्या एका पुरुषाचा, चैतन्यनगर नांदेड येथील 56 वर्षाच्या एका पुरुषाचा, विणकर कॉलनी नांदेड येथील 62 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे तर रविवार 27 सप्टेंबर रोजी भोकर तालुक्यातील पाळज येथील 60 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 390 झाली आहे.  

275 कोरोनाबाधित व्यक्तींमध्ये सुधारणा
जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड 23, बिलोली कोविड केअर सेंटर 3, कंधार कोविड केअर सेंटर 3, मुखेड कोविड केअर सेंटर 17, भोकर कोविड केअर सेंटर 1, खाजगी रुग्णालय 23, अर्धापूर कोविड केअर सेंटर 15, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी नांदेड 19, किनवट कोविड केअर सेंटर 30, माहूर कोविड केअर सेंटर 10, नायगाव कोविड केअर सेंटर 8, एनआरआय / पंजाब भवन / महसूल भवन / होमआयसोलेशन 115, हदगाव कोविड केअर सेंटर 8 असे 275 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.

जिल्ह्यात 245 कोरोनाबाधितची भर
आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 46, लोहा तालुक्यात  1, किनवट तालुक्यात  4, कंधार तालुक्यात 4, नायगाव तालुक्यात 3, भोकर तालुक्यात 1, लातूर 1, नांदेड ग्रामीण 2, हदगाव तालुक्यात  3, उमरी तालुक्यात 1, मुखेड तालुक्यात 4, परभणी 3, हिंगोली 3 असे एकुण 76 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 52,  हदगाव तालुक्यात 1, धर्माबाद तालुक्यात 5, किनवट तालुक्यात 8, भोकर तालुक्यात  2, माहूर तालुक्यात  3, उमरी तालुक्यात 4, नांदेड ग्रामीण 2, मुदखेड तालुक्यात 2, लोहा तालुक्यात 6, मुखेड तालुक्यात 7, नायगाव तालुक्यात 6, कंधार तालुक्यात 6, हिंगोली 2असे एकूण 106 बाधित आढळले.





Post a Comment

0 Comments