Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणी शहरात 83 जणांची कोरोना चाचणी; 3 आढळले बाधित





परभणी
➡️ शहर महानगरपालिकेच्या वतीने सोमवारी गुरूवारी(दि.28) रोजी शहरातील 5 केंद्र, 7 खासगी रुग्णालयात व प्रभाग समिती अ तर्फे 83 व्यक्तींची रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्टद्वारे तपासणी करण्यात आली. यात 80 निगेटीव्ह तर 3 व्यक्ती पॉझिटीव्ह आढळल्या.
 
सीटी क्लब येथे 23 जणांची तपासणी केली असता 1 व्यक्ती, 7 खासगी रुग्णालयात 33 जणांची तपासणी केली असता 2 व्यक्ती पॉझिटीव्ह आढळले.खानापूर येथील आरोग्य केंद्रात 3, मनपा रुग्णालयात 8, खंडोबा बाजार आरोग्य केंद्रात 2, साखला प्लॉट आरोग्य केंद्रात 5, प्रभाग समिती अ तर्फे 9 जणांची तपासणी करण्यात आली.कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी विना मास्क घरा बाहेर पडू नये, सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे, किमान सहा महिने महत्वाच्या कामाशिवाय बाहेर नातेवाईकांकडे,बाहेरगावी जाणे टाळा, अति गरजेचे असल्याशिवाय आपण स्वतः कोणाकडे जावू नका, कोरोना कोणाच्या मदतीने घरात येईल हे सांगता येत नाही. 
 
ज्या घरात लहान मुले व 60 वर्षावरील व्यक्ती आहेत त्यांची विशेष काळजी घ्यावी. अति व फाजील आत्मविश्‍वास बाळगू नका, कसला कोरोना होतो अशी बेजबाबदार भाषा अलीकडे दिसून आली आहे. अशा लोकांना टाळा किंवा समजवून सांगा, शेकहॅन्ड़ करू नका, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. स्वतः आपण आपली काळाजी घ्यावी. प्रतिकार शक्ती वाढेल तसेच अन्नाचे सेवन करावे, असे आवाहन आयुक्त देविदास पवार यांनी केले आहे.





Post a Comment

0 Comments