Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

कातनेश्वरात आई व मुलाचा शॉक लागून मृत्यू





परभणी
➡️ पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर येथे घरावरील पत्रात विद्युत प्रवाह उतरल्याने धक्का लागल्याने आई व मुलाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.28) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत दुसरा लहान मुलगा जखमी झाला. त्याच्यावर परभणीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

प्राप्त माहितीनुसार पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर येथील बबन चव्हाण यांच्या घरावरुन महावितरण कंपनीची विद्युत तार गेली आहे.  बबन चव्हाण हे कामगार म्हणून काम करतात. त्याचा मोठा मुलगा मयत आकाश (वय 25) हा परभणी येथे आपल्या पत्नी सोबत राहतो. आजच आकाश आपल्या आईवडीलांना भेटण्यासाठी आला होता. आज दुपारी 12 वाजेच्या दरम्यान मयत आकाश यांचा हात पत्र्याला लागला. त्यांत विद्युत प्रवाह उतरल्यामुळे आकाश त्या पत्र्याला चिकटला. 

त्याला सोडविण्यासाठी त्यांची आई जिजाबाई (वय 46) गेली असताना ती पण चिकटली. या दोघांना वाचविण्याचा प्रयत्न धाकटा मुलगा विकास धावला असता तो पण चिकटला. घरात असलेल्या त्यांचे वडील बनन राव यांनी मदतीसाठी आरडाओरड केल्यामुळे कोणीतरी विद्युत पुरवठा खंडीत केला. त्यानंतर लोकांनी बेशुध्द आकाश व जिजाबाई यांना उपचारसाठी एरंडेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती केले. पण उपचार सुरु होण्यापूर्वी दोघांचा मृत्यू झाला, अशी माहिती डाॅक्टरांनी दिली. तसेच 20 वर्षीय विकास हा गंभीर जखमी असल्यामुळे त्याला परभणी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

 

 
 
 
 
 
 
 





Post a Comment

0 Comments