Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणी शहर कोरोनामुक्त होण्यासाठी मनपा करणार 72 हजार घरांचे सर्वे





परभणी
➡️ परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने शहराती बी.रघुनाथ सभागृह येथ आज दि. 28, सोमवार रोजी दुपारी 1 वाजता शहरातील एनजीओ, बचत गट, आशा वर्कर, सामाजिक कार्यकर्ते यांची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत माझे कुटुंब माझी जवाबदारी या अभियान अंतर्गत व कोवीड-19 नियंत्रणात आणण्यासाठी तसेच मृत्यु दर कमी करण्यासाठी शहरामध्ये 72 हजार 400 घरांचा सर्वे करण्यासंबंधीत बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले. 
 
या वेळी आयुक्त देविदास पवार, उपायुक्त जगताप, आरोग्य अधिकारी डॉ.कल्पना सावंत,  डॉ.सचिन बायसकर यांची उपस्थिती होती. यावेळी आयुक्त देवीदास पवार यांनी शहरातील प्रत्येकाच्या घरी जाऊन माझे कुटुंब माझी जवाबदारी या योजनेबाबत माहिती देऊन संवाद साधावा. शहरातील 97 पथके तयार करण्यात आले आहे. यामध्ये प्रत्येक पथक 5 सदस्य असणार आहेत. यात अंगणवाडी सेविका, एनएएम, आशा वर्कर, डॉक्टर असणार आहेत. घरोघरी जाऊन तपासणी करणार आहेत. त्यांना सहकार्य करा व नागरिकांमध्ये असलेली भिती दुर करण्यासाठी एनजीओ ने सहकार्य करावे, रॅपीड अँटिजन टेस्ट शहरामध्ये 16 ठिकाणी केंद्र सुरू आहेत त्याठिकाणी करावी. अंगावर ताप काढू नये, खोकला सर्दी असल्यास त्वरीत तपासणी करावी. 
मधूमेह, हृद्य विकार, असल्यास दरोरोज तापमान मोजावे, नागरिकांनी विनाकाररण घराबाहेर पडू नये. गर्दीच्या ठिकाणी मास्क लावावे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे, आपल्या घरी आरोग्य पथ्लृक आल्यास सर्व कुटुंबाची तपासणी करा, नागरिकांनी संपर्कात येऊ नये. शहरामध्ये 100 एनजीओ असतील प्रत्येक एनजीओ मध्ये 7 ते 9 जण सभासद असतात. यांनी जनजागृती करावी. शहरामध्ये 72 हजार 400 घरांचा सर्वे करावयाचा आहे. सॅनिटाईझरचा वापर करावा. घरी आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवावे. शासनाने जवाबदारी घेतली आहे. कॉलनी अंतर्गत महानगरपालिकेची रॅपीट अँटीजन टेस्ट साठी मोबाईल व्हॅन मनपाद्वारे व्यवस्थ केली आहे. शहरामध्ये आरोग्याचा नकाशा तयार करावयाचा आहे. 
 
मनपाच्या वतीने एनजीओ, कोरोनायोद्धा, शिक्षक यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी आलेले एनजीओ यांनी देखील आपने मनोगत व्यक्त केले. यावेळी समाजसेवक तथ्लृा माजी नगरसेवक गुलाम मोहम्मद मिठ्ठू यांनी प्रभागांतर्गत नागरिकांची बैठक घ्यावी असे सुचविले. आयुक्त पवार यांनी  कोरोना पॉझिटिव्ह असल्यास घरी सुविधा असल्याच कॉरेंटाईन व्हावे. प्रभागांतर्गत जाऊन माहिती घेणार आहे.  40 टक्के स्लम एरीया आहे. लहान घर असल्यास मनपा ने रेणुका मंगल कार्यालय, अक्षदा मंगलकार्यालय व सेवाभावि संस्थेच्या वैष्णवी मंगल कार्यालय येथ ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
 
यावेळी उपायुक्त जगताप यांनी प्रदिप जगताप यांनी शासनाच्या कार्याक्रमानिमित्त घरोघरी जाऊन आरोग्य कर्मचार्‍यांना तपासणी करने आदी साठी सहकार्य करावे असे आव्हान केले. ज्यांचे वय 40 ते 50 पेक्षा जास्त आहे त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. कार्यशाळा घेण्याचा उद्देश आपल्या मार्फत नागरिकांमध्ये भिती दुर करण्यासाठी आपले सहकार्य अपेक्षीत आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गजानन जाधव, सुभाष मस्के, इक्तार खान पठाण यांनी परिश्रम घेतले.








Post a Comment

0 Comments