Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

नांदेड जिल्ह्यात 263 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी, 154 बाधितांची भर तर चार जणांचा मृत्यू




नांदेड ➡️  सोमवार 28 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 263 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 154 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 74 तर अँटिजेन तपासणीद्वारे 80 बाधित आले.

04 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू
रविवार 27 सप्टेंबर रोजी पोर्णिमानगर नांदेड येथील 54 वर्षाच्या एका महिलेचा, कंधार येथील 90 वर्षाच्या एका पुरुषाचा, नांदेड येथील 55 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे तर सोमवार 28 सप्टेंबर रोजी उमरी येथील 52 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 394 झाली आहे.

263 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी
जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड 14, बिलोली कोविड केअर सेंटर 7, धर्माबाद कोविड केअर सेंटर 7, मुखेड कोविड केअर सेंटर 16, लोहा कोविड केअर सेंटर 7, खाजगी रुग्णालय 25, अर्धापूर कोविड केअर सेंटर 3, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी नांदेड 14, किनवट कोविड केअर सेंटर 8, माहूर कोविड केअर सेंटर 5, नायगाव कोविड केअर सेंटर 12, एनआरआय / पंजाब भवन/ महसूल भवन / होमआयसोलेशन 142, उमरी कोविड केअर सेंटर 3 असे 263 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.

जिल्ह्यात 154 कोरोनाबाधितची भर
आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 42, माहूर तालुक्यात 1, किनवट तालुक्यात 4, कंधार तालुक्यात 3, नायगाव तालुक्यात 2, हिंगोली 3, नांदेड ग्रामीण 1, हदगाव तालुक्यात 11, उमरी तालुक्यात 1, मुखेड तालुक्यात 4, परभणी 2, असे एकुण 74 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 55, अर्धापूर तालुक्यात 1, धर्माबाद तालुक्यात 3, किनवट तालुक्यात 8, भोकर तालुक्यात 3, देगलूर तालुक्यात 3, माहूर तालुक्यात 1, लोहा तालुक्यात 1, नायगाव तालुक्यात 4, हिंगोली 1 असे एकूण 80 बाधित आढळले.




Post a Comment

0 Comments