Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

प्रथम कोरोनाबाधित आरोपीला न्यायालयाने ठोठावले 500 रुपये दंड




परभणी
➡️ कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाच्या पाश्र्वभूमीवर मोटारसायकलद्वारे पुण्याहून परतलेल्या अन् कोरोनाबाधित निघालेल्या जिल्ह्यातील पहिल्या त्या बाधित युवकासह अन्य दोन नातेवाईकांना कोरोना रोग पसरेल अशी जाणीवपूर्वक कृती करून नागरिकांचा जीव धोक्यात आणण्याचा प्रयत्न करने आणि सरकारच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल मुख्य न्यायदंडाधिकारी महेश तिवारी यांच्या न्यायालयाने मंगळवारी (दि.29) प्रत्येकी 500 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

प्राप्त माहिती नुसार पुण्यातील भोसरी येथून 16 एप्रिल रोजी एक युवक शहरातील सुंदर नगरात दाखल झाला होता. तोच युवक कोरोनाबाधित आढळून आला. परभणी शहर हे ग्रीन झोनमध्ये असताना तो युवक बाधित आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती. प्रशासनाने या गोष्टीची गंभीर दखल घेतली अन् तत्काळ कारवाई करत त्या रुग्णास ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले. विशेष म्हणजे त्यावेळी त्या रुग्णासह त्याच्या नातेवाईकांनी निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल तसेच तो युवक कोरोनाबाधित असतानाही लपवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तसेच शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणूनही प्रशासनाने त्या युवकाविरूध्द तसेच अन्य दोघां नातेवाईकांविरूध्द या प्रकरणी नवामोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिस कर्मचारी माधव धंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गजानन पांचाळ, सचिन पांचाळ व महादू पांचाळ या 03 जणांविरूध्द साथ रोग पसरवेल अशी त्याने कृती केली व नागरिकांना धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला व शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक रामेश्वर तट यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी विठ्ठल राठोड यांनी तपास करत न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे सौ. शोभा देशमुख यांनी बाजू मांडली. न्यायाधीश महेश तिवारी यांनी आरोपी गजानन पांचाळ, सचिन पांचाळ, मारोती पांचाळ या तिघांना प्रत्येकी 500 रुपयांचा दंड सुनावला. नवा मोंढा पोलिस ठाण्याचे कर्मचारी अफजल खान पठाण यांनी कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.






Post a Comment

0 Comments