Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

गंगाखेड बसस्थानक समोरील व्यापार संकुल वाचवण्यासाठी व्यापार्‍यांचे उपोषण सुरू





परभणी ➡️ गंगाखेड बसस्थानक समोरील नगर परिषदेचे मालकीचे असलेले व्यापार संकुल उठवण्यासाठी हालचाली सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर व्यापार्‍यांनी व्यापार संकुल वाचवण्यासाठी व्यापार्‍यांनी मंगळवारी (दि.29) सायंकाळपासून उपोषण सुरू केले आहे.

गंगाखेड ते नांदेड रस्त्यावर उड्डाणपूलाचे काम प्रगती पथावर आहे. या पुलाच्या व बसस्थानकाच्या बाजूस गंगाखेड नगर परिषदेचे व्यापार संकुल आहे. या संकुलात 20 वर्षापासून नगर पालिकेने ठरवून दिलेल्या भाडे तत्वावर व्यापारी आपले व्यवहार करत आहेत. गाळेधारकांना 2017 साली सार्वजनिक बांधकाम विभागाने व नगर परिषदेने जागा अतिक्रमण आहे म्हणून नोटिसा बजावल्या होत्या. हीच जागा आम्हाला नगर परिषदेने 2001 साली भाडेतत्त्वावर दिली. या संकुलातील व्यापार्‍यांच्या दुकानात 03 हजार लोकांचा उदरनिर्वाह चालतो. 

संकुलातील ही दुकाने बंद झाली तर सर्व व्यापारी रस्त्यावर येतील. त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहील, असा सूर या व्यापार्‍यांनी आळवला आहे. मंगळवारी (दि.29) नगर परिषदचे कर्मचार्‍यांनी व्यापार्‍यांना बुधवारी (दि.30) संकुल हटवण्याबाबत सूचना दिल्या. त्यामुळे अस्वस्थ व्यापार्‍यांनी मंगळवारी (दि.29) सायंकाळपासून उपोषण सुरू केले आहे. प्रशासनास दिलेल्या निवेदनावर सखाराम बोबडे, भगवान बडवणे, सौ संगिता गवळे, किशन आडकीने, अतुल सुरवसे, स हुसेन स मुसुज, स सरवर स हुसेन, अशोक सुर्वे,स शकील स सलीम, गणेश फड,स सलीम स माखूब,साखरे ,शिवाजी डमरे, स नबी स हसन,रवी पोटे,विजयकुमार डमरे,गजानन कवठेकर आदीसह 25 जणांच्या स्वाक्षर्‍या आहेत.




Post a Comment

0 Comments