Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

खासदार संजय जाधवच्या राजीनामापुढे झुकले राज्य सरकार




जिंतूर व मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुदतवाढी अखेर स्थगिती

परभणी ➡️ खासदार संजय जाधव यांनी राजीनामाच्या माध्यमातुन केलेली मागणीस मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गांभीर्याने घेत जिंतूर व मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासकीय मंडळाच्या मुदतवाढीस शनिवारी (ता.29) स्थगिती दिली आहे.
    शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासकीय मंडळास मुदतवाढीच्या विषयाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना राजीनामा दिला होता. या राजीनामा पत्रातून खासदार संजय जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या या प्रशासकीय मंडळास दुस-यांदा मुदतवाढीचा निर्णय म्हणजे शिवसेनेच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर घोर अन्याय आहे, असे मुख्यमंत्र्यांना सांगितले होते. जिंतूर आणि मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संदर्भामध्ये शिवसेनेचे परभणी खासदार संजय जाधव यांनी राजीनामा अस्त्र वापरले होते त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची बाजू समजून घेत दिलासा दिला आहे. 

    नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचेही भेट घेवून त्या विषयाच्या अनुषंगाने नाराजी व्यक्त केली. याच बाबीची मंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेवून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना जिंतूर व मानवत समितीवरील नेमलेल्या प्रशासक मंडळास स्थगिती द्यावी, अशी शिफारस 27 ऑगस्ट रोजी एका पत्राद्वारे केली. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या या पत्रावर जिंतूर व मानवत समितीवरील प्रशासकीय मंडळाच्या नियुक्तीबाबत तपासणी करावी तोपर्यंत स्थगिती देण्यात येत आहे, असे टिपणी करीत पणनच्या प्रधान सचिवांना आदेश दिला आहे असे समजते. या अनुषंगाने पणन महासंघ व जिल्हा उपनिबंधक यांना अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचे सुचना किंवा आदेश शनिवारी दुपारपर्यंत प्राप्त झाला नाही.


 




Post a Comment

0 Comments