Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

महाबीजसमोर भाजपाचे बोगस बियाने फेकून केले आंदोलन





परभणी ➡️ बोगस बियाण्यांच्या विक्री प्रकरणातील दोषी विरूध्द तात्काळ कारवाई करावी व शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या संतप्त नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि.29) येथील जिंतूर रस्त्यावरील महाबीजच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. 

माजीमंत्री तथा आ.बबनराव लोणीकर मार्गदर्शनाखाली हे आंदोलन यांच्या  करण्यात आले. यावेळी  माजी आ.अ‍ॅड.विजय गव्हाणे, भाजपयुमोचे प्रदेश सरचिटणीस,राहूल लोणीकर, युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सर्जेराव जाधव, जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम,गणेशराव रोकडे,प्रमोद वाकोडकर, अजय गव्हाणे, रामकिशन रौंदळे,अभय चाटे, शिवहरी खिस्ते, लिंबाजीराव भोसले, भीमराव वायवळ, मधुकर गव्हाणे, अनुप शिरडकर, सुनिल देशमुख, राजेश देशमुख, भागवत बाजगीर, बाळासाहेब फले, डी.एस.कदम, बाळासाहेब देशमुख, चंद्रकांत चौधरी, बाळासाहेब जाधव, चंद्रकांत डहाळे, सादेक अली इनामदार, बाळासाहेब भालेराव आदी सोबत संतप्त पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांनी जिंतूर रस्त्यावरील महात्मा फुले विद्यालयापासून बैलगाडीद्वारे महाबीजच्या कार्यालयावर धडक मारली. 

तेथील प्रवेशद्वारावर ठाण मांडून या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि बोगस बीयाणे फेकून निषेध केला. महाबीजसह अन्य कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर बोगस बियाणे विक्री करीत सर्वसामान्य शेतक-यांची अक्षरक्षः पिळवणुक केली आहे. केवळ चार जिल्ह्यातच 27 हजार क्विंटल बोगस बियाणे विक्री झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्वतःहून या प्रकरणात याचिका दाखल केली. तसेच संबंधीत कंपन्याविरूध्द गुन्हे दाखल करावेत, असे आदेश दिले. त्याही पलीकडे दोषी अधिका-यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करा, अशा कडक सुचना सुध्दा दिल्या. 

या प्रकरणात महाबीजसह अन्य खासगी कंपन्यांविरूध्द भारतीय दंड संहिता 1830 कलम 420 34 बीज अधिनियम 6 व 7(ब) बियाणे नियम 1968 कलम 23(अ) 2 नुसार गुन्हे दाखल झाले आहेत. परंतू राज्य सरकारद्वारे महाबीजच्या मुजोर अधिका-यां विरूध्द अद्यापपर्यंत कारवाई करण्यात आलेली नाही. दोषी अधिका-यांना विरूध्द तात्काळ पोलिसी कारवाई झाली पाहिजे, तसेच सर्वसामान्य शेतक-यांना नुकसान भरपाई सुध्दा मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा माजीमंत्री तथा आ.लोणीकर यांनी केली. परभणी व उस्मानाबाद या दोन जिल्ह्यात बियाणे न उगवल्याने दोन शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत, असे लोणीकर यांनी निदर्शनास आणून दिले.



Post a Comment

0 Comments